Ahmednagar News : खा.विखे पाटलांची साखर मिळण्यासाठी महिला दिवसभर रांगेत, गावचा कोटा संपला असे सांगून कार्यकर्ते झाले पसार..ग्रामस्थांचा मोठा संताप

Ahmednagarlive24 office
Updated:

Ahmednagar News : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सध्या दक्षिणेत साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु केला आहे. पाच किलो साखर आणि चना दाळ असे वाटप सध्या प्रत्येक रेशनकार्ड केले जात आहे. दिवाळीच्या वेळी उत्तरेत याचे वाटप करण्यात आले होते.

परंतु त्यानंतर मात्र दक्षिणेतील अनेक नेत्यांनी राजकीय आरोप प्रात्यारोप केले. निवडून दक्षिणेतून यायचं व साखर उत्तरेत वाटायची असे आरोप झाले. त्यानंतर मात्र दक्षिणेत पाच किलो साखर आणि चना दाळ असे वाटप खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सुरु केले होते. परंतु यातच एक मोठा गोंधळ उडाला आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामस्थांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे लोक रेशन कार्डची झेरॉक्स जमा करून दोनशे रुपयांची साखर मिळण्यासाठी दिवसभर रांगेत उभा राहिले होते.

परंतु ऐनवेळी तुमच्या गावचा कोटा संपला असे सांगून उरलेल्यांना साखर वाटपच कार्यकर्त्यांनी न करता निघून गेले. पण त्यानंतर मात्र गावातील वयोवृद्ध महिलांसह गावातील अनेकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

त्यामुळे आता या भागामधील ग्रामस्थांच्या रोषाला खासदारांच्या यंत्रणेला सामोरे जावे लागते की काय असे वाटू लागले आहे.

 काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते की, अनेकांना दिवसभर थांबूनही साखर मिळाली नाही त्यामुळे महिलांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून साखर द्यायचीच नव्हती तर रेशनकार्डच्या झेरॉक्स घेवून उन्हात उभे का केले असा संतप्त सवाल महिला करताना दिसत आहेत.

तसेच काही तरुण म्हणत आहेत की, दोनशे रुपयांची साखर घेण्यासाठी महिला चारशे रुपयांचा रोज बुडवून बिना भाकरीच्या रांगेत दिवसभर उभ्या आहेत. परंतु त्यांना साखर न देताच कार्यकर्ते माघारी गेले.

जितक्या रेशन कार्ड झेरॉक्स नेल्या त्यानुसार तरी नियोजन करायला हवे होते असे लोक म्हणत आहेत. त्यामुळे आता अनेक ठिकाणी सुरळीत पार पडलेला साखर वाटप कार्यक्रमास बोधेगावच्या घटनेने गालबोट लागले असल्याचे बोलले जात आहे.

 जानेवारीत पुन्हा दिवाळी

श्रीराम मंदिरांचे उदघाटन कार्यक्रम तोंडावर आला आहे. त्यामुळे याच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघात उदघाटनानिमित्ताने दुसरी दिवाळी साजरी करण्यात यावी व नागरिकांनी ही साखर व दाळ यांच्यापासून लाडू तयार करून श्रीरामाला नैवेद्या दाखवावे असे

आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केलेले होते. दक्षिणेत टप्प्या टप्प्याने मतदारसंघातील सर्व तालुक्यांत हे वाटप होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या वाटपासाठी गावातील रेशन कार्ड धारकांची माहिती घेऊन त्यांच्या

झेरॉक्स जमा करून वाटपाचा कर्यक्रम केला जातो. पण आता या व्हायरल व्हिडिओनंतर साखर वाटपातील गोंधळावरून गावागावात वाद निर्माण होतानाचे चित्र समोर आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe