नवी दिल्ली 18 मे 2020 :-जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही या विषाणूने उच्छाद मांडला आहे. परंतु भारतात या रुग्णांची बरे होण्याचे प्रमाण चांगले म्हणजे 38.29 टक्के इतके आहे.
परंतु बरे झालेल्या रुग्णाबाबत एक चिंताजनक बाब समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना गंभीर समस्यांचा सामना करावो लागत आहे.
या रुग्णांचे अवयव खराब झालेत, शिवाय त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोनाव्हायरसवर मात केलेल्या रुग्णांचं फुफ्फुस आणि हृदय खराब होतं असल्यानं त्यांना उपचाराची गरज भासू शकते.
कोरोना रुग्णांमध्ये एनिजीना किंवा एरिथाइमिया यासारख्या हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. या रुग्णांच्या मांसपेशींना हानी पोहोचते आहे आणि मानसिक समस्याही बळावत आहेत.
यामध्ये डिप्रेशन, झोप न लागणं या समस्यांचा समावेश आहे. परंतु यात आणखी गोष्ट विचार करण्यासारखी आहे की, ज्या रुग्णांमध्ये सौम्य किंवा मध्यम लक्षणं आहेत, त्यांच्यावर असा परिणाम दिसून आला नाही.