श्रीगोंदा बाजार समितीत कांदा खरेदी पुन्हा सुरू ! २००० रुपये बाजारभाव काढत केले रोख पेमेंट

Ahmednagarlive24 office
Published:
Onion News

Onion News : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दीड वर्षापासून बंद झालेल्या कांदा खरेदीची सोमवार (दि.२५) रोजी सुरुवात होऊन पहिल्याच दिवशी २७०० गोण्या गुलाबी कांद्याची विक्रमी आवक झाली.

या वेळी १८०० ते २००० रुपये बाजार देऊन शेतकऱ्यांना रोख पेमेंट केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे तसेच संचालक अजित जामदार यांनी दिली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लादल्यामुळे, बाजारभाव कमी झाल्यामुळे तसेच अवकाळी पावसाची भीती, यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावात कांदा विक्रीसाठी आणला जात आहे.

मागील दीड दोन वर्षापासून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंद असलेला कांदा लिलाव बाजार समितीचे नूतन सभापती अतुल लोखंडे, उपसभापती मनीषा मगर तसेच संचालक मंडळाच्या प्रयत्नाने कांदा खरेदीस सोमवार (दि.२५) रोजी सुरुवात झाली.

पहिल्याच दिवशी २७०० गोण्या गुलाबी कांद्याची विक्रमी आवक झाली. या वेळी १८०० ते २००० रुपये बाजार देऊन शेतकऱ्यांना रोख पेमेंट करण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होत असल्याची माहिती संचालक अजित जामदार यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe