रोहित पवारांना मतदारसंघातूनच होतोय विरोध

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच कर्जत जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार निवडून आले असून, आगामी काळात मात्र येथे रोहित पवार यांना धोबीपछाड देणार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केला. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी ॲड. शिंदे यांची तर युवक तालुकाध्यक्षपदी धुमाळ यांची निवड केल्यानंतर या दोघांनी कर्जत येथे पत्रकार परिषद घेतली. ते पुढे म्हणाले की, राज्यात अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेचीच इच्छा आहे, ग्रामीण भागात त्याच्या कामाच्या झपाट्याने लोक प्रभावित आहेत.

आतापर्यंत त्यांना अडचणी होत्या मात्र आता कुणाला विचारावे लागणार नाही ते आपला निर्णय घ्यायला समर्थ आहेत. कर्जत जामखेड मतदार संघात व आगामी निवडणुकीत महायुती ठरवेल तो उमेदवार असेल पण कर्जत जामखेड मतदार संघात आमचा आमदार व्हावा अशी आमची व पक्षाची इच्छा आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आमच्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला अहमदनगरची जागा मिळावी अशी आमची आग्रही मागणी असणार आहे, व लोकसभे निवडणुकी नंतर बरेच चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे यापुढील काळात रोहित पवारांसाठी या मतदार संघात आपले स्थान टिकवून ठेवणे जरा अडचणीचे ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe