तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोधडीत असतील…! खा.संजय राऊत यांची टीका

Published on -

अहमदनगर : ५५ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठं गेले होते शिवसेना स्थापन करायला?शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोधडीत असतील अशी अत्यंत परखड टीका शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर करून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हीच शिवसेना असल्याचे त्यांनी म्हटले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत ठाकरे गटातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच ही जागा कॉँग्रेस मागत आहे. मुळातच शिवसेनेकडे ज्याला तुम्ही ठाकरे गट असे म्हणता, त्याला आम्ही काही मानत नाही. त्यामुळे शिवसेना आमचीच आहे.असेही ते म्हणाले.

आमदारांच्या अपात्रेच्या निकालासंदर्भात ते म्हणाले, की विधानसभेच्या अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयाने जी निवड केली आहे, त्यांच्यावर न्यायदानाची जबाबदारी आहे. महानंदा दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या खासदार राऊत यांनी समजून घ्यावे, या विधानावर ते म्हणाले, की तुम्ही इतके वर्ष काय करत होता? महानंदा ही राज्यातील दुध उत्पादक क्षेत्रातील महत्वाची सरकारी संस्था आहे.

तुम्हाला ती चालवता आली नाही. म्हणून ती संस्था राष्ट्रीय संस्थेकडे देण्याची वेळ आली. पाच ते सहा महिन्यांपासून लोकांचे पगार नाही. उत्पादन घटले आहे. वितरण कमी झालेलं आहे. याला जबाबदार कोण? महानंदा दुध संघाची मुंबईतील २७ एकर जमीन आहे. त्या
जमिनीवर काही लोकांचा डोळा असल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe