लिफ्टमधून पसरू शकतो कोरोना ? तज्ज्ञ म्हणतात ..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जे लोक उंच इमारतींमध्ये राहतात त्यांच्यासाठी कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात लिफ्ट वापरणे धोकादायक ठरू शकते.

जरी आपण एकटेच लिफ्टमध्ये चढलो तरी जे लोक आपल्या अगोदर लिफ्टमध्ये गेले आहेत ते किटाणू सोडू शकतात.व्हर्जिनिया टेकचे एरोसोल वैज्ञानिक लिन्से मार म्हणतात की लिफ्टचा धोका आहे.

बर्‍याच लिफ्ट लहान असतात, ज्यात लोक एकमेकांपासून 6 फूट अंतरावर उभे राहू शकत नाहीत. या प्रकरणात, संक्रमित व्यक्ती कोरोना विषाणूचा प्रसार उर्वरित लोकांमध्ये करू शकतो.

लिफ्टमध्ये असा होईल धोका जरी आपण लिफ्टमध्ये एकटे असाल, परंतु तरीही आपल्याला अनेक मार्गांनी संसर्ग होऊ शकतो.

लिफ्ट बटणे, बाजूच्या रेलला स्पर्श केल्यानंतर जर आपण त्याच हातांनी चेहऱ्याला स्पर्श केला तर आपल्याला कोरोना विषाणू होण्याचा धोका असतो.

लिफ्टमधील व्हायरल हवा? कोरोना विषाणूच्या पेशंटने लिफ्ट वापरल्यानंतर, तुम्हीही त्याच लिफ्टमध्ये गेल्यास, हवेतील विषाणू तुम्हालाही आजारी पाडू शकतात.

तज्ञ काय म्हणतात? बरेच तज्ञ हवेतून संक्रमण होईल असा दावा करत नाहीत. त्यामुळे लिफ्टमधून कोरोना पसरू शकतो यावर ते संपूर्ण सहमत नाहीत.

संशोधनात असे आढळले आहे की जरी कोरोना विषाणूचा रुग्ण घरी बाकीच्या लोकांभोवती राहत असेल तरही, त्या लोकांना 10-20 टक्के संसर्ग होण्याचा धोका आहे. कि जो इतर आजारांत 75-90 टक्के आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment