अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- Apple कंपनीचा ‘स्वस्त’ iPhone SE 2020 या फोन आजपासून भारतात लॉन्च झाला आहे. iPhone SE 2020 हा सर्वात स्वस्त iPhone असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
याची किंमत 42 हजार 500 रूपये असून फ्लिपकार्टवर एचडीएफसी ग्राहकांसाठी हा फोन 38,900 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. F/१.८ सह १२ मेगापिक्सेलचा हा कॅमेरा असून याद्वारे 4के व्हिडीओही शूट करता येणार आहे.
तर सेल्फीसाठी यामध्ये ७ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासोबतच यात एचडीआर आणि पोर्टेटसारखेही फिचर्स आहेत. ब्लॅक, व्हाईट आणि (प्रोडक्ट) रेड या रंगांच्या पर्यायात नवीन आयफोन उपलब्ध असेल.
iPhone SE 2020 मध्ये ४.७ इंचाचा रॅटिना HD IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये आयफोनच्या अत्याधुनिक A13 Bionic chip चा वापर करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त या मोबाइलमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR10 चा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, वायफाय 802.11ax, वायफाय कॉलिंग, NFC, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS देण्यात आलं आहे.
तसंच यामध्ये टच आयडी बटणही आहे. iPhone SE 2020 चा लुक iPhone 8 प्रमाणेच आहे. तसंच हा फोन IP67 रेटिंगसह येतो. त्यामुळे हा फोन डस्ट आणि वॉटर रेझिस्टंटदेखील आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com