Snake Species: ‘हा’ साप दिसला पहिल्यांदा! संशोधकांनी शोधली कोरल सापाची नवीन प्रजात, वाचा काय आहेत या सापाची वैशिष्ट्ये?

Ajay Patil
Updated:
new snake species

भारतामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आणि इतर कीटकांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या अनेक प्रकारच्या प्रजाती आपल्याला दिसून येतात. यामध्ये संशोधकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्राणी तसेच कीटकांवर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात येते व यामधून अनेक नवनवीन प्रजातींची भर पडताना आपल्याला दिसून येत आहे.

यामध्ये जर आपण सापाचा विचार केला तर हा एक सरपटणारा वर्गातील प्राणी आहे हे आपल्याला माहिती आहे व जगाच्या पाठीवर साडेतीन हजार पेक्षा जास्त प्रजाती सापांच्या असून त्यातील काही विषारी व बऱ्याच बिनविषारी वर्गातील आहेत. तसेच प्रत्येक प्रजातीचे वैशिष्ट्ये देखील वेगवेगळे असे आहेत.

सापांवर देखील अनेक संशोधकांच्या माध्यमातून संशोधन करण्यात येते व अगदी याच पद्धतीने नुकतेच मिझोराम विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधकांनी मिझोराम राज्यांमध्ये एक कोरल सापाची नवीन प्रजात शोधून काढली असून या प्रजातीला ब्रिटिश भारतातील डॉक्टर गोरे यांच्या नावावरून सिनोमिक्रूरस गोरेई असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या लेखात आपण या सापाची काय वैशिष्ट्ये आहेत व यावर संशोधक काय म्हटले? याविषयीची माहिती घेऊ.

 संशोधकांनी लावला सापाच्या नव्या प्रजातीचा शोध

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मिझोराम विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधकांनी राज्यांमध्ये कोरल सापाची एक नवीन प्रजाती शोधली असून या प्रजातीला ब्रिटिश भारतातील डॉक्टर गोर यांच्या नावावरून सीनोमिक्रूरस गोरोई असे नाव देण्यात आलेले असून या विद्यापीठातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक एच.टी.लालरेमसांगा यांच्यासह इतर संशोधकांनी प्रवाळ सापांच्या नव्या प्रजाती शोधून काढल्या असून मिझोराम राज्यातील इतर संशोधकांनी देखील यामध्ये खूप मोठी मदत केलेली आहे.

 काय आहेत सापाच्या या जातीची वैशिष्ट्ये?

याबाबत अभ्यास करण्यात आलेला असून या अभ्यासात असे दिसून आले आहे की सापाची सिनोमिक्रूरस मॅक्लेलेडी हे प्रजात एका वेळी 6 ते 14 अंडी घालू शकते व याच्यातीलच आत्ताची ही सीनोमिक्रूरस गोरोई तीन अंडी घालते. यामध्ये सीनोमिक्रूरस मॅक्लेलॅडी प्रामुख्याने डोंगराळ किंवा उंच भागामध्ये आढळून येते तर गोरेई सकल भागामध्ये आणि डोंगराळ भागात आढळून येते.

 या प्रजातीबद्दल संशोधकांनी काय म्हटले?

याबाबत संशोधकांनी सांगितले की, मिझोराम मधील प्रवाळ सापांचे कंकाल आणि डीएनए यांचा अभ्यास करताना संशोधकांना या नव्या प्रजाती आढळून आल्या. 10 जानेवारीला सिस्टिमॅटिक्स आणि बायोडायव्हर्सिटी या ब्रिटिश विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झालेले संशोधन अहवालात या प्रजातींविषयी संपूर्णपणे माहिती देण्यात आलेली आहे. आतापर्यंत जगभरात सिनोमीक्रूरस सापांच्या एकूण नऊ प्रजातींचा शोध लागला असून यातील सीनोमिकृरस मॅक्लेलेडी नावाची एकच प्रजाती आढळून आली असती ईशान्य भारतात आढळून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe