Scholarship For Girls:-समाजातील विविध घटकांकरिता केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना असून या घटकांचे सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. त्यासोबतच शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुला मुलींचे शिक्षण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट राहू नये याकरिता देखील शासनाच्या अनेक योजना आहेत.
यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच शिष्यवृत्ती योजना या फार महत्त्वाच्या असून या माध्यमातून शिक्षणाकरिता आर्थिक मदत केली जाते. यामध्ये जर आपण मुलींचा विचार केला तर बेटी बचाव बेटी पढाओ या मोहिमेला बळकटी देण्याकरिता सरकारने अनेक शिष्यवृत्ती योजना देखील सुरू केल्या असून यांचा लाभ घेऊन मुली उच्च शिक्षण घेऊ शकतात. याच शिष्यवृत्ती योजनांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
या आहेत मुलींसाठी महत्त्वाच्या शिष्यवृत्ती योजना
1- प्रगती शिष्यवृत्ती योजना– सरकारच्या एचआरडी अर्थात मनुष्य व विकास मंत्रालयाकडून दरवर्षी चार हजार मुलींना प्रगती शिष्यवृत्ती देण्यात येते व यामध्ये ज्या मुली पात्र आहेत व ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाख रुपयांपर्यंत आहे, अशा मुली याकरिता पात्र आहेत.
प्रगती शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मुलींना पदवी शिक्षणा दरम्यान संपूर्ण वर्षासाठीची ट्युशन फी किंवा तीस हजार रुपये आणि दहा महिन्यांकरिता दोन हजार रुपये दिले जातात. सर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मुलींना घ्यायचा असेल तर AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे गरजेचे आहे. तसेच कुटुंबातील फक्त एका मुलीला या शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.
2- बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना– या शिष्यवृत्तीला मौलाना आझाद शिष्यवृत्ती असे देखील म्हटले जाते. त्यानुसार इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्याक महिलांना आर्थिक सहाय्य देण्याची यामध्ये तरतूद असून यामध्ये वर्गात 50 टक्के गुण मिळवणाऱ्या आणि ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना 6000 रुपयांपर्यंतची मदत मिळते. या शिष्यवृत्तीचे फॉर्म तुम्हाला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये करता येऊ शकतो.
3- स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती– सोशल सायन्स मध्ये संशोधनाकरिता सिंगल गर्ल चाइल्डला यूजीसीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती या मुलींसाठी आहे की त्या कोणत्याही विद्यापीठातून सोशल सायन्स मध्ये पीएचडी करत आहेत.
पीएचडीच्या पहिल्या दोन वर्षासाठी प्रत्येक महिला 25000 रुपये फेलोशिप मिळते व उरलेल्या कालावधीत प्रत्येक महिन्याला 28 हजार रुपये दिले जातात. या शिष्यवृत्तीसाठी फक्त मुलींना अर्ज करता येतो व जी मुलगी पालकांची एकुलती एक मुलगी आहे. तसेच मुलीचे वय 40 वर्षापेक्षा जास्त नसणे गरजेचे आहे.
4- पोस्ट ग्रॅज्युएट इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड– ज्या महिला त्यांच्या पालकांच्या एकुलती एक आहेत आणि 60% गुणांसह त्यांनी दहावी पास केलेली आहे अशा महिलांना आर्थिक मदत या माध्यमातून मिळते. गुणवंत विद्यार्थ्यांना अभ्यासाला प्रोत्साहन मिळावी याकरिता ही शिष्यवृत्ती योजना राबवली जात असून यानुसार प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांची मदत मिळते.
6- वूमन सायंटिस्ट स्कीम-B- ज्या महिलांना टेक्निकल करिअरमध्ये ब्रेक घ्यायचा आहे अशा महिला सायंटिस्ट आणि टेक्नॉलॉजिस्टला प्रथम मिळावे याकरता ही योजना राबवण्यात यश असून या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 55 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची वयोमर्यादा किमान 27 कमाल 57 वर्ष असणे गरजेचे आहे.तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात दरम्यान फॉर्म भरू शकतात.