Fortuner सोबत स्पर्धा करणाऱ्या ‘या’ SUV ची किंमत झाली कमी, ग्राहकांचे दीड लाख रुपये वाचणार, वाचा सविस्तर

MG Gloster Price Drop : MG Motor ही एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार बाजारात धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या अनेक मॉडेलच्या किमती कमी केल्या आहेत.

एकीकडे देशातील अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय गाड्यांच्या किमती वाढवल्या जात आहेत तर दुसरीकडे एमजी मोटर या कंपनीने आपल्या लोकप्रिय गाड्यांच्या किमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरे तर सध्या स्थितीला एमजी मोटर ही कंपनी आपले शताब्दी वर्ष सेलिब्रेट करत आहे.

या पार्श्वभूमीवर कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्तात कार उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कंपनीने एमजी कॉमेट EV या आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची किंमत एक लाख रुपयांनी कमी केली आहे. याशिवाय फॉर्च्यूनर या लोकप्रिय कारला टक्कर देणाऱ्या एमजी ग्लॉस्टर या एसयुव्ही कारची देखील किंमत कमी करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांचे लाखो रुपये वाचणार आहेत.

MG Gloster ची किंमत किती कमी झाली

कंपनीने ऑक्टोबर 2020 मध्ये ही गाडी पहिल्यांदा भारतीय बाजारात लॉन्च केली होती. भारतीय बाजारात MG Gloster लाँच झाली तेव्हापासून ही गाडी विशेष चर्चेत आहे. या गाडीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे.

दरम्यान याच लोकप्रिय कारबाबत कंपनीने मोठा निर्णय घेतला असून याच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. कंपनीने या गाडीची किंमत अंदाजे 1.31 लाख रुपयांनी कमी केली आहे.

आत्तापर्यंत या गाडीची सुरुवातीची किंमत 38.80 लाख एवढी होती. आता मात्र या गाडीची सुरवातीची किंमत 37.49 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही किंमत गाडीची एक्स शोरूम किंमत आहे.

MG Gloster चे स्पेसिफिकेशन अँड फीचर्स 

MG Gloster एकूण दोन डिझेल इंजिन पर्यायांसह येते, ज्यात 2 लिटर टर्बो आणि 2 लिटर ट्विन टर्बो डिझेल इंजिन समाविष्ट आहे. हे 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

7-सीटर आणि 8-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये येत असलेल्या, या SUV मध्ये 7 भिन्न ड्रायव्हिंग मोड आहेत. ज्यामध्ये स्नो, मड, सैंड, इको, स्पोर्ट, ऑटो आणि रॉक या मोड्स आहेत.

यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, 12-वे ॲडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, वायरलेस फोन चार्जर देण्यात आले आहे. याशिवाय, पीएम 2.5 एअर फिल्टर, हँड्स-फ्री टेलगेट, रेन-सेन्सिंग वाइपर आणि 3-झोन ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग (AC) समाविष्ट आहेत.

यामध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, लेन चेंज असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन सारखी ADAS यांसारखे हायटेक फीचर्स देखील आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe