Horoscope 2024:- ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर एक ठराविक कालावधीमध्ये ग्रह स्वतःच्या स्थानात बदल करत असतात म्हणजेच परिवर्तन करत असतात व हा बदल एका राशीतून दुसऱ्या राशीत होत असतो. तसेच ग्रहांचा वेग कसा आहे यावर ते एका राशीत किती दिवस राहतील हे ठरत असते.
यावरून शनि देवाचा जर विचार केला तर शनीचा वेग हा अत्यंत कमी असल्यामुळे तो एका राशीत बरेच दिवस थांबतो.म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत स्थान बदल करण्यासाठी जास्त वेळ घेतो. ज्योतिष शास्त्रानुसार शनीला आपले स्थान बदलण्यासाठी अडीच वर्ष जास्तीत जास्त साडेसात वर्षांचा कालावधी लागतो.
सध्या कर्मदाता शनी कुंभ राशीत असून यासोबतच शुक्र व बुध या तीन ग्रहांची युती या राशीत होत असल्यामुळे या ठिकाणी त्रिग्रही राजयोग निर्माण झालेला आहे. त्यामुळे या योगाचा फायदा काय राशींना खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्या राशी कोणत्या? या याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
त्रिग्रही राजयोगाचा फायदा होणार या राशींना
1- वृषभ– हा योग वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायद्याचा सिद्ध होणार आहे. या राशीचे जे व्यक्ती व्यवसायात असतील त्यांना विशेष फायदा होण्याची शक्यता असून या कालावधीत या राशींच्या व्यक्तींना लागणारे भांडवल व आर्थिक पाठबळ सहजपणे मिळणार आहे. तसेच गुंतवणूक केलेली असेल तर त्या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता आहे. राशींच्या व्यक्तींनी कुटुंबामध्ये एखादा वाद असेल तर त्यामध्ये न बोललेले उत्तम ठरेल. तसेच तुमच्या कामानुसार तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे कामात कुठल्याही प्रकारचा कंटाळा करू नये.
2- मिथुन- मिथुन राशींच्या व्यक्तींना या त्रिग्रही योगामुळे नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे तसेच काही कामे सुरू केलेले असतील तर ते पूर्ण होणार आहेत. कामांमधून मोठे यश मिळेलच परंतु धनलाभ देखील चांगला मिळणार आहे. या राशीच्या व्यक्तींनी स्वतःला कमी न लेखता काही गोष्टींकडे धाडसाने बघण्याची गरज आहे.
तुम्हाला जर गरज पडली तर इतर लोकांचा सल्ला अवश्य घ्या परंतु स्वतःच्या मनाचा कौल काय आहे ते अगोदर ऐकून मग निर्णय घेणे गरजेचे आहे. येऊ घातलेल्या रथसप्तमीनंतर या राशींच्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये सूर्याचा सुद्धा प्रभाव असल्याने ही युती होताच या राशींच्या व्यक्तींचे सुवर्णयुग सुरू होऊ शकते असे देखील शक्यता आहे.
3- कुंभ- विशेष म्हणजे कुंभ राशी मध्येच हा राजयोग तयार होत असल्यामुळे कुंभ राशींच्या व्यक्तींच्या कुंडलीत प्रथम स्थानी या राज योगाचा प्रभाव दिसून येणार आहे. या राशीच्या लग्न भावात राजयोगाचा प्रभाव असल्याने या कालावधीत या राशींचे व्यक्ती आत्मविश्वासाने काही गोष्टी करतील
व असं केल्याने त्यांना फायदा होणार आहे. एवढेच नाही तर रथसप्तमीपासून सूर्याचा प्रभाव असल्यामुळे या राशींच्या व्यक्तिमत्त्वाला आत्मविश्वासाची जोड लाभून चांगला फायदा होणार आहे. एवढेच नाही तर समाजामध्ये मानसन्मान वाढीस लागू शकतो.
( टीप– वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी कुठल्याही प्रकारचा दावा आम्ही करत नाहीत.)