Bike Drive Tips:- आजकाल प्रत्येकाच्या घरी आपल्याला बाईक दिसून येतात. घरातील अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला बाईक चालवता येते. अगदी जरा कुठे अंतरावर जायचे राहिले तरी आपण पायी चालत न जाता बाईकचा वापर करत असतो.
म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा बाईक हे अविभाज्य भाग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तसेच आजकालची तरुणाई म्हटली म्हणजे सुसाट वेगाने बाईक चालवण्याची क्रेझ आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येते.
परंतु इतर वाहनांप्रमाणेच बाईक चालवण्याच्या देखील काही योग्य अशा पद्धती आहेत. यामध्ये जर आपल्याकडून अनावधानाने चूक घडली तर अपघाताला निमंत्रण मिळू शकते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपण जेव्हा बाईक चालवतो तेव्हा काही अडथळा आला किंवा समोर एखादे वाहन आले तर आपण बाईकचे ब्रेक दाबतो
व बाईकचा वेग कमी करतो किंवा बाईक थांबवतो. यामध्ये दोन सवयी प्रामुख्याने बाईक चालवणाऱ्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. काहीजण ब्रेक मारताना क्लच न दाबता ब्रेक मारतात किंवा काहीजण क्लच आणि ब्रेक सोबत दाबतात.
परंतु तुम्हाला जर बाईक थांबवायची असेल तर अगोदर क्लच दाबावा की ब्रेक? इत्यादी संबंधी महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.
बाईक थांबवण्यासाठी अगोदर क्लच दाबावा की ब्रेक?
तसे पाहायला गेले तर बाईक तुम्हाला थांबवायचे आहे तर आधी क्लच दाबावा की ब्रेक हे तेव्हाच्या परिस्थितीवर प्रामुख्याने अवलंबून असते.
आपल्याला माहीतच आहे की यामध्ये ब्रेक लावताना बाईकचा नेमका वेग किती आहे किंवा ती कोणत्या गेअर मध्ये आहे हे देखील आपल्याला यामध्ये प्रकर्षाने समजून घेणे खूप गरजेचे आहे. परंतु तरीदेखील साधारणपणे…
1- समजा आपण बाईक चालवत आहोत अचानक समोर कोणी आले व अचानक ब्रेक लावण्याची गरज उद्भवली तर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये क्लच आणि ब्रेक दोन्ही एका वेळी दाबणे योग्य ठरेल. प्रामुख्याने दोघांचा वापर अशा इमर्जन्सी मध्ये केला जातो.
इमर्जन्सी ब्रेक लावण्यामुळे बाईकच्या काही यांत्रिक भागांना नुकसान पोहोचू शकते व असे होऊ नये म्हणून क्लच आणि ब्रेक अशा परिस्थितीत एकत्र दाबणे हे फायद्याचे ठरते.
2- समजा तुम्ही वेगात जात आहात आणि तुम्हाला वेग कमी करायचा आहे तर तुम्ही फक्त ब्रेक दाबून दुचाकीचा वेग कमी करू शकतात.
समजा तुम्हाला तुमच्या बाईकचा वेग तुमची बाईक ज्या गेअरमध्ये आहे तिच्या सर्वात खालच्या पातळीवर आहे असे जर वाटत असेल तर तुम्हाला अशावेळी क्लच दाबून गिअर उतरवणे गरजेचे राहिल. नाहीतर गाडी बंद पडू शकते.
3- तुम्ही वेगात न जाता सामान्य वेगाने बाईक चालवत आहात व तुम्हाला यापेक्षा अजून वेग कमी करायचा असेल तर फक्त ब्रेक जरी दाबला तरी कमी होतो.
अशावेळी तुम्हाला क्लच वापरण्याची गरज भासत नाही. म्हणजे साधारणपणे ब्रेकचा वापर तुम्ही वेग कमी करण्यासाठी आणि काही किरकोळ अडथळा रस्त्यावर आला तर तो टाळण्यासाठी तुम्ही करू शकतात.
4- तुम्ही वेगात रस्त्याने जात आहात व तुम्हाला ब्रेक लावायचा आहे तर अशावेळी तुम्ही आधी क्लच दाबावा आणि नंतरच ब्रेक दाबावा. कारण अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही आधी ब्रेक दाबला तर बाईक बंद पडण्याची शक्यता असते.
साधारणपणे तुम्ही क्लच आणि ब्रेक एकत्र हे पहिल्या किंवा दुसऱ्या गीअरमध्ये दाबु शकतात. परंतु जास्त वेगात असाल तर मात्र आधी ब्रेक लावावेत. जास्त वेगामध्ये जर तुम्ही अगोदर क्लच दाबला आणि नंतर ब्रेक दाबला तर गाडी स्लीप होण्याचा धोका असतो.