भंडारदरावर आले बुरे दिन ! पर्यटक फिरायला येईनात, असं काय झाले ज्यामुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम ?

Ahmednagarlive24
Published:
Bhandardara

भंडारदरा अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र यावर्षी तहानलेलेच राहणार असल्याचा अंदाज आहे. जायकवाडी प्रकल्पासाठी भंडारदऱ्याचे पाणी गेल्याने भंडारदरा पर्यटनावरही विपरीत परिणाम झाला आहे.

अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरण क्षेत्र हे अहमदनगर जिल्ह्याचे पावसाचे क्षेत्र समजले जाते. दरवर्षी सहा ते साडे सहा हजार मीमी पावसाची नोंद धरणाच्या पाणलोटात होत असते.

मात्र गत पावसाळ्यात भंडारदऱ्याच्या पाणलोटात पावसाची मेहेरबानी झाली असली तरी धरणाच्या लाभक्षेत्रात मात्र पावसाची फटकेबाजी झाली नाही. त्यातच जायकवाडी धरणाला जाऊन मिळणाऱ्या प्रवरा व मुळा या दोन्हीही नद्या म्हणाव्या तशा वाहत्याच झाल्या नाहीत.

साहजिकच जायकवाडीचा ‘पाणीसाठा समाधानकारक झालाच नाही. समान पाणी वाटपाच्या धोरणामुळे जायकवाडी प्रकल्पातही ‘पाऊस नसल्याने भंडारदरा धरणातुन पाणी सोडले गेले. त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारी महिण्यात भरलेले धरण मात्र निम्म्यापेक्षाही कमी झाले.

भंडारदरा धरणाच्या परिसरात व पाणलोटात आत्ताच सुर्य आग ओकण्यास सुरुवात झाली आहे. भंडारदरा धरणात पाच टी एम सी पाणी जरी शिल्लक असले, तरी घरणातुन धरण लाभक्षेत्रासाठी पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडले जाणार, यात तिळमात्र शंका नाही.

साहजिकच एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यापासुन भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्‍यता स्थानिकांकडुन वर्तविण्यात येत आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात जवळ जवळ प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची ‘जलयोजना राबविण्यात आलेल्या अहेत.

या जलयोजणाच धरणात पाणी कमी झाल्यामुळे उघड्या पडणार आहेत. भंडारदऱ्याच्या ‘पाणलोटातील पांजरे, उडदावणे, लव्हाळवाडी, साम्रद, रतनवाडी, ‘कोलटेंभे यासारखी पावसाची समजली जाणारी गावे ऐन उन्हाळ्यात तहानलेलीच राहणार आहेत. यासाठी शासनाकडुन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe