Tata Harrier EV : टाटा लवकरच लॉन्च करणार Harrier EV ! सिंगल चार्जवर देणार इतकी रेंज, पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ahmednagarlive24 office
Published:
Tata Harrier EV

Tata Harrier EV : टाटा मोटर्सकडून देशातील ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या अनेक EV कार लॉन्च केल्या आहेत. त्यांच्या EV कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता टाटा यावर्षी त्यांची Harrier EV लॉन्च करणार आहे.

सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये टाटाचा EV सेगमेंट मजबूत असल्याचे दिसत आहे. टाटाकडून आतापर्यंत त्यांच्या चार EV कार लॉन्च केल्या आहेत. या चारही EV कार कमी बजेटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत.

टाटा मोटर्सकडून EV सेगमेंट आणखी मजबूत करण्यासाठी नवीन EV कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा त्यांची Harrier EV कार यावर्षी भारतीय मार्केटमध्ये लाँच करणार आहे.

Harrier EV एसयूव्ही कारमध्ये नवीन ब्लँक-ऑफ ग्रिल, अँगुलर क्रिझसह अद्ययावत फ्रंट बंपर, स्प्लिट सेटअप आणि नवीन रुंद एलईडी लाइट बारसह नवीन हेडलॅम्प दिला जाईल. Harrier EV कारमध्ये आकर्षक अलॉय व्हील्स देण्यात येतील.

नवीन रुंद एलईडी लाइट बारसह पुन्हा डिझाइन केलेले टेल लॅम्प, अँगुलर इंडेंटसह अपडेट केलेले बंपर आणि अतिरिक्त बॉडी क्लॅडिंग Harrier EV मध्ये पाहायला मिळत आहे.

Active.EV प्लॅटफॉर्मवर Harrier EV कार तयार केली जाणार आहे पंच EV कार देखील याच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. फ्रंट-व्हील ड्राइव्ह (FWD), रीअर-व्हील ड्राइव्ह (RWD) आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) Harrier EV मध्ये देण्यात येणार आहे.

Harrier EV इंटेरियर

टाटाकडून त्यांच्या Harrier EV कारच्या केबिनमध्ये लक्झरी फीचर्स दिले जाणार आहेत. कारच्या केबिनमध्ये एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ड्रायव्हिंग मोड्ससाठी रोटरी डायल्स, नवीन ट्विन-स्पोक स्टीयरिंग व्हील, एसी व्हेंट्स आणि आणखी जबरदस्त फीचर्स दिले जाणार आहेत.

Harrier EV बॅटरी आणि रेंज

टाटाकडून त्यांच्या Harrier EV कारला 60kWh बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे. एका चार्जवर Harrier EV कार 400 ते 500 किमी रेंज देण्यास सक्षम असेल. टाटाकडून अद्याप कारच्या बॅटरी आणि रेंजबाबत खुलासा केलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe