Ahmednagar Breaking : आदर्शगाव हिवरे बाजार शिवारात गांजाची शेती, मुद्देमाल जप्त !  तालुका पोलिसांची मोठी कामगिरी 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking :  आदर्शगाव हिवरे बाजार शिवारात गांजाची शेती सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी साहेबराव मारुती ठाणगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अडीच किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. नगर तालुका पोलिसांनी २६ फेब्रुवारीस ही कारवाई केली.

मंगेश साहेबराव खरमाळे यांनी याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, २६ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजता सपोनि गिते,

पोसई रंजीत मारग, पोकाँ  टकले आदींसह अवैध धंद्याची माहिती काढत असताना जखणगाव ते हिवरेबाजार रोडवर हिवरेबाजार शिवारात साहेबराव मारुती ठाणगे यांनी शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली.

त्यांसुर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता शेतात गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याचे निदर्शनास आले. तेथे ५००० रुपये किमतीचा अडीच किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

आदर्शगाव हिवरे बाजार या गावाची ख्याती जगभरात आहे. शेती, पाणी व्यवस्थापन, श्रमदान आदींसह अनेक गोष्टींचा आदर्श घेण्यासाठी विविध राज्यातून लोक या ठिकाणी येत असतात. परंतु आता याच गावच्या शिवारात गांजाची शेती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.