Rent Agreement:- जेव्हा आपण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने एखाद्या शहरांमध्ये वास्तव्याला जातो तेव्हा आपल्याला एखादे घर भाड्याने घ्यावे लागते किंवा कालांतराने एका भाड्याच्या घरामधून दुसऱ्या भाड्याच्या घरात आपल्याला स्थलांतरित व्हावे लागते. शहरांमध्ये जेव्हा आपण भाड्याच्या घरात राहिला जातो तेव्हा आपल्याकडून घरमालक भाडेकरार करून घेत असतो हे देखील आपल्याला माहिती आहे.
हा भाडेकरार मालक आणि भाड्याने राहणारे व्यक्ती यांच्यामध्ये एक कायदेशीर व महत्त्वाचे कागदपत्रे असते. त्यामुळे अशा पद्धतीचा भाडेकरार करताना तुम्ही बऱ्याच गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देणे खूप गरजेचे असतं. नाहीतर यामुळे भविष्यात तुम्ही एखाद्या अडचणीत सापडू शकतात.
तुम्ही जेव्हाही भाडेकरार कराल तेव्हा त्यामध्ये नमूद केलेल्या अटी अतिशय काळजीपूर्वक वाचणे गरजेचे असते. भाडे करारामध्ये जी काही आपण सिक्युरिटी म्हणून जे पैसे देतो त्या पैशांचा देखील यामध्ये उल्लेख केलेला असतो. त्यामुळे जेव्हा आपण घर खाली करतो म्हणजेच रिकामे करतो
तेव्हा ती रक्कम कशी दिली जाईल किंवा कशी समायोजित केली जाईल त्याकडे देखील तुम्ही लक्ष देणे गरजेचे असते. तसेच भाडे करार हा 11 महिन्यांनी रिन्यूअल केला जातो. तसेच एक वर्षानंतर घर भाड्यामध्ये साधारण दहा टक्क्यांची वाढ होते. परंतु भाडेवाढ करायची की नाही किंवा किती वाढ करायची हे दोन्ही पक्षांच्या संमतीवरच अवलंबून असते.
भाड्याच्या घरात राहायला जाण्या अगोदर या गोष्टींची काळजी घ्या
1- ज्या घरामध्ये तुम्हाला राहायला जायचे आहे त्या घराची वायरिंग तसेच आतील नळांची स्थिती कशी आहे? हे तुम्ही तपासून घेणे गरजेचे आहे. घरामधील काही गोष्टीमध्ये तुम्हाला बिघाड दिसत असेल तुम्ही ते घर मालकाच्या निदर्शनास आणणे गरजेचे आहे. नाहीतर जेव्हा तुम्ही घर सोडाल तेव्हा तुम्हाला घर मालकाकडून त्या नुकसानीची भरपाई करण्यास सांगितले जाऊ शकते.
2- तसेच घराचे नियमित दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च कोण करणार हे देखभालीच्या बाबतीत स्पष्ट असणे गरजेचे आहे. नाहीतर नंतर तुम्हाला काही त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
3- प्रत्येक महिन्याला भाडे कधी भरणार हे भाडे करारात नक्कीच जाणून घ्या किंवा वेळेत भाडे न भरले तर अतिरिक्त काही शुल्क भरावे लागेल का हे देखील यामध्ये स्पष्ट करा.
4- जर तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये घर भाड्याने घेतले तर त्या ठिकाणी तुम्हाला पार्किंग, जिम तसेच क्लब व स्विमिंग पूल च्या सुविधांकरिता काही अतिरिक्त पैसे मागितले जाऊ शकतात. या सर्व गोष्टींचा उल्लेख भाडेकरारात करणे गरजेचे आहे. तसेच भाडे करारामध्ये घरमालकाने कोणती एखादी वेगळी किंवा अतिरिक्त अट तर जोडलेली नाही ना यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
5- तसेच भाडे करार करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या आर्थिक आणि कायदेशीर अधिकारांचे संरक्षण होईल.
भाडेकरार करताना कोणत्या गोष्टी तपासून पहाव्या?
1- कायदेशीर बाबी– भाडेकरार तयार करण्यापूर्वी स्थानिक भाडे नियम आणि कायदेशीर बाबी समजून घेणे गरजेचे आहे. याकरिता तुम्ही एखाद्या स्थानिक वकील किंवा मालक संस्थेचा सल्ला घेऊ शकता. म्हणजेच आपल्याला योग्य मार्गाने व माहितीपूर्ण असा भाडे करार तयार करता येईल.
2- एग्रीमेंटमध्ये सर्व तपशील समाविष्ट करणे– भाडे तयार करताना त्यामध्ये भाड्याची रक्कम, भाडे देण्याचा कालावधी व भाडे देण्याची पद्धत, तारीख, भाडेवाढ, ठेव रक्कम,सुरक्षा ठेव,अतिरिक्त अटी याशिवाय इतर गोष्टींचा स्पष्ट उल्लेख करावा.
3- घराची परिस्थिती बघणे– भाड्याने घर घेण्याअगोदर आपण भाड्याच्या मालमत्तेची स्थिती काय आहे हे काळजीपूर्वक बघणे गरजेचे आहे. तसेच करार करताना कोणतेही नियम आणि तोट्याची नोंद करा आणि करारामध्ये त्याचा समावेश करा.
4- सिक्युरिटी डिपॉझिट– बाजारामध्ये जे काही निकष आहेत त्यानुसार सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम किती घ्यावी हे निश्चित करा. घेतलेली ही रक्कम कधी आणि कशी परत केली जाईल याचा देखील उल्लेख करणे महत्त्वाचे ठरते.
5- तसेच भाडे करारातील दंड आणि रद्द करण्याच्या कोणत्या अटी आहेत त्या समजून घ्याव्या व त्यांचा करारात योग्य रीतीने उल्लेख करावा. संपूर्ण भाडेकरार वाचून समजून घेतल्यानंतरच त्यावर सही करावी. तुम्हाला जर काही संशय असेल तर तुम्ही वकिलांचा सल्ला घेऊ शकतात.