LIC Policy : LIC ही देशातील सर्वात जुनी विमा कंपनी आहे, जी आपल्या ग्राहकांसाठी एका पेक्षा एक योजना ऑफर करते. कोरोना काळानंतर प्रत्येक व्यक्ती गुंतवणुकीला महत्व देत आहे, आणि भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कमी उत्पन्न असलेल्या लोकांना नेहमीच उदरनिर्वाहाच्या संकटाचा सामना करावा लागतो, त्यामुळे या वर्गातील लोक भविष्यासाठी काहीही नियोजन करू शकत नाहीत. अशा लोकांसाठी LICची भाग्य लक्ष्मी योजना ही खरोखर नशीब बदलणारी योजना आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाची भाग्य लक्ष्मी योजना ही एक सूक्ष्म विमा योजना आहे. सूक्ष्म विमा योजना म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचे सुरक्षित भविष्य लक्षात घेऊन तयार केलेली योजना. ही कमी विम्याची योजना आहे. विशेष म्हणजे यावर जीएसटी लागू नाही. भाग्य लक्ष्मी योजनेमध्ये मुदत योजना तसेच परतावा प्रीमियम योजना आहे. या योजनेत, तुम्हाला भरलेल्या प्रीमियमवर केवळ मुदतीचा विमा मिळत नाही, तर तुम्हाला मुदतपूर्तीवर जमा ठेवीपैकी 110 टक्के परतावा देखील मिळतो.
LIC भाग्य लक्ष्मी योजना गुंतवणूक, बचत आणि विमा पॉलिसी म्हणून काम करते. पॉलिसी पूर्ण झाल्यावर, विमा धारकास जमा केलेल्या प्रीमियमच्या एकूण 110 टक्के रक्कम मिळते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या अवलंबितांना मृत्यू लाभ दिला जातो.
भाग्य लक्ष्मी योजनेची वैशिष्ट्ये :-
-LIC भाग्य लक्ष्मी योजनेची किमान विमा रक्कम 20,000 रुपये आहे.
-भाग्य लक्ष्मी योजनेअंतर्गत कमाल विम्याची रक्कम 50,000 रुपये आहे.
-LIC भाग्य लक्ष्मी पॉलिसीचा कालावधी किमान 7 वर्षे आणि कमाल 15 वर्षे आहे.
-किमान प्रीमियम भरण्याची मुदत 5 आहे आणि कमाल मुदत 13 वर्षे आहे.
-LIC भाग्यलक्ष्मी योजना घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 आणि कमाल वयोमर्यादा 55 वर्षे आहे.
-या योजनेत, प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक किंवा एकरकमी भरता येतो.
-भाग्य लक्ष्मी योजनेत, वार्षिक मोड प्रीमियममध्ये 2 टक्क्यांपर्यंत सूट आहे.
-अर्धवार्षिक मोडवर पेमेंट केल्यास प्रीमियमवर 1टक्के सूट दिली जाते.