Weather Forecast: भारतातील ‘या’ राज्यांना तुफान पावसासह गारपिटीचा इशारा! वाचा महाराष्ट्रात कशा पद्धतीचे राहील हवामान?

Weather Forecast:- सध्या मार्च महिना सुरू असून सगळीकडे आता कमाल तापमानामध्ये वाढ होऊ लागली आहे. म्हणजेच उन्हाच्या झळा तीव्र झाल्यामुळे अंगाची लाही लाही करणारा उकाडा दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे.

साधारणपणे ही परिस्थिती संपूर्ण भारतामध्ये असून महाराष्ट्रामध्ये तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 35 ते 40 अंश दरम्यान आहे. तसेच देशातील काही राज्यांमध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस अजून देखील पडत असल्याची स्थिती आहे.

सध्या महाराष्ट्र मधील हवामान पाहिले तर दिवसा उकाडा आणि सकाळी थंडी अशी काहीशी स्थिती असल्याचे दिसून येते. परंतु या पार्श्वभूमीवर देशाच्या उत्तर पश्चिम भारतात हवामानात मात्र वेस्टर्न डिस्टर्बनच्या प्रभावामुळे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली

असून देशाच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे तर येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये देशातील काही भागांना अवकाळी पावसासह गारपीटीचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे.

 कसे राहील देशाचे हवामान?

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार बघितले तर आज आणि उद्या 14 मार्च रोजी देशातील लडाख, जम्मू आणि काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी हिमवर्षाव देखील होण्याची शक्यता आहे.

यासोबतच पंजाब तसेच हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात 13 मार्च रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच 14 मार्च म्हणजेच उद्या पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तसेच 13 ते 17 मार्च या कालावधीत पश्चिम बंगाल मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल व 14 ते 17 मार्च या कालावधीत ओडिसा राज्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे. त्यासोबत झारखंड,

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात 16 ते 17 मार्च रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ईशान्य कडील आसाम तसेच मेघालय, नागालँड आणि मनिपुर, त्रिपुरा आणि मिझोराम मध्ये येणाऱ्या तीन दिवसात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

 महाराष्ट्रात कसे राहील हवामान?

सध्या महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या वर गेल्यामुळे नागरिकांना उकाडा जाणवू शकतो व सामना देखील करावा लागू शकतो असा हवामान खात्याने म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्रामध्ये पुढील आठवडाभर तरी कुठल्याही भागांमध्ये पावसाची शक्यता नसल्याचे देखील भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.