Bank FD Interest Rate : 7 दिवसांपासून ते 12 महिन्यांच्या FD वर मिळत आहे जबरदस्त परतावा, आताच करा गुंतवणूक…

Ahmednagarlive24 office
Published:
Bank FD Interest Rate

Bank FD Interest Rate : बाजारात कितीही गुंतवणूक पर्याय उपलब्ध असले तरीही, एफडी हा नेहमीच सुरक्षित पर्याय मानला जातो. जर तुम्ही एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार जिथे कमी कालावधीतही जास्त व्याजाचा लाभ मिळत आहे. या बँका 7 दिवस ते 12 महिन्यांच्या FD वर सर्वाधिक व्याज लाभ देत आहे. या यादीत PSU आणि स्मॉल फायनान्स बँकांचही समावेश आहे.

HDFC बँक

एचडीएफसी बँक सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 3 टक्के ते 6.00 टक्के दरम्यान व्याज सुविधा देत आहे.

ICICI बँक

ICICI बँक सामान्य नागरिकांसाठी 7 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 3 टक्के ते 6.00 टक्के दरम्यान व्याजदर देते.

येस बँक

खाजगी क्षेत्रातील येस बँक 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 3.25 टक्के ते 7.25 टक्के दरम्यान व्याज देत आहे.

PSU बँका :-

SBI FD व्याजदर

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 3 टक्के ते 5.75 टक्के पर्यंत व्याज देत आहे.

PNB FD

PNB (पंजाब नॅशनल बँक) सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 3 टक्के ते 7 टक्के दरम्यान व्याजाचा लाभ देत आहे.

कॅनरा बँक

कॅनरा बँक 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 4 टक्के ते 6.85 टक्के दरम्यान व्याज देत आहे.

लघु वित्त बँका :-

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 4.50 टक्के ते 7.85 टक्के पर्यंत व्याज सुविधा देत आहे.

जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांसाठी 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 3 टक्के ते 8.50 टक्के पर्यंत व्याज देत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 4 टक्के ते 6.85 टक्के पर्यंत व्याज देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe