महाविकास आघाडीच्या बॅनरवर राजीव राजळेंचा फोटो

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : स्व. राजीव राजळे यांचा फोटो महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या बॅनरवर वापरला आहे. त्यासाठी राजळे कुटुंबाची परवानगी घेतलेली नाही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आमदार मोनिका राजळे यांचे विश्वासू सहकारी विष्णुपंत अकोलकर यांनी केली आहे.

शेवगाव येथे महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची सभा रविवारी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. या सभेच्या निमंत्रणपत्रिका असणाऱ्या बॅनरवर स्व. राजीव राजळे व स्व. गोपीनाथजी मुंडे यांचे फोटो वापरले आहेत.

त्यावरून राजळे यांच्या समर्थकांनी आक्षेप नोंदवला आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे ह्या भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवार असताना त्यांचे वडील स्व. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो महाविकास आघाडीने वापरण्याचे कोणतेही कारण नाही.

आमदार मोनिकाताई राजळे या खासदार सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्व. राजीव राजळे यांचा फोटो त्यांच्या बॅनरवर वापरला आहे. याला राजळे समर्थकांनी विरोध दर्शवला असून, निवडणूक आयोगाने याची दक्षता घ्यावी.

मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार आहे, हा वेळीच रोखावा, अशी मागणी विष्णुपंत अकोलकर यांनी केलेली आहे. राजळे यांचा फोटो वापरण्यासाठी राजळे कुटुंबाची अथवा राजळे यांच्या वारसाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही,

त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल तर हा फोटो वापरण्यास आमचा विरोध असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे अकोलकर यांनी लेखी स्वरूपात केली आहे. यावरून महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये मतभेद वाढले आहेत.

विखे यांच्या समर्थक असलेल्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सहकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यामुळे निवडणुकीला चांगलाच रंग भरला आहे. बॅनरवर महाविकास आघाडी, असे लिहिले आहे. मात्र, प्रकाशक किंवा मुद्रक,

असा कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे याला जबाबदार कोण, याची खात्री करावी लागेल. विष्णुपंत आकोलकर यांच्या तक्रारीमुळे निवडणूक आयोगालाही दखल घ्यावी लागणार आहे. निवडणुकीच्या सुरुवातीलाच तक्रार दाखल झाल्याने आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई, वार्ड करते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe