‘अशी’ आहे अभिनेता गोविंदाची लव्हस्टोरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-गोविंदाने हिंदी सिनेमासृष्टीवर चांगलेच वर्चस्व गाजवले. चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या गोविंदाची लव्हस्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे.

सुनीताच्या मोठ्या बहिणीचे गोविंदाच्या मामासोबत झाले होते. त्यामुळे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी सुनीता अनेकवेळा त्यांच्या घरी यायची. ते दोघे त्यावेळी खूपच लहान होते.

त्यामुळे ते दोघे प्रचंड भांडायचे. त्या दोघांचा स्वभाव एकमेकांपेक्षा खूपच वेगळा होता. गोविंदाला सुनीता खूपच उद्धट वाटायची. गोविंदा आणि सुनीता यांना दोघांनाही नृत्याची आवड होती.

त्यामुळे गोविंदाचे मामा सुनीता आणि गोविंदाला डान्सची कॉम्पिटिशन करायला सांगायचे. पण सुनीता ही हाय सोसायटीमधील असल्याने गोविंदासोबत स्पर्धा करणे तिला पटत नसे.

पण याच भांडणातून त्यांच्यात प्रेम फुलत गेले. त्यावेळी फोनचे प्रमाण खूपच कमी असल्याने ते दोघे एकमेकांना प्रेमपत्र लिहित असत. ही पत्र पोहोचण्याचे काम सुनीताचा भाऊ करत असे.

पण एकदा हे पत्र सुनीताच्या आईच्या हातात लागले. त्या पत्रात सुनीताने तिला गोविंदासोबत लवकरात लवकर लग्न करायचे आहे असे लिहिले होते.

गोविंदाची आई निर्मिला देवी यांना देखील सुनीता खूप आवडायची. त्यामुळे त्या दोघांच्या घरातल्यांनी लगेचच या लग्नासाठी होकार दिला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment