सॅनिटायझर नसेल तर कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी करा ‘हा’ सोपा उपाय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यावर लस शोधण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्नशील आहेत. परंतु यावर अद्याप ठोस पर्याय किंवा औषध आलेले नाही.

यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. डॉक्टरांनी वेळोवेळी हात धुण्याचा सल्ला दिलाय. सॅनिटायझर आणि हॅन्डवॉशचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून, काही दुकानांमध्ये सॅनिटायझर उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे घाबरून न जाता काही सोपे पर्याय आपण करू शकतो.

इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅनिटायझरच्या ऐवजी साबणाचा वापर करता येऊ शकत असल्याचं ते म्हणाले.

साबण बनवण्यासाठीदेखील त्याच केमिकलचा वापर केला जातो, जे सॅनिटायझरमध्ये असतात. ज्यावेळी आपण बाहेर असतो किंवा आपल्याकडे साबण नसतो, त्यावेळी सॅनिटायझरचा वापर करणं गरजेचं आहे.

सॅनिटायझर न मिळाल्यास, किंवा अशा जागी जेथे साबण, हॅन्डवॉश नसेल त्यावेळी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. अशावेळी इतरांनी हात लावलेल्या जागी हात लावू नका.

जर हात लावला असेल, तर हात पाण्याने स्वच्छ धुवेपर्यंत तोंडाजवळ, नाकाजवळ नेऊ नका. यामुळे संसर्गापासून वाचता येऊ शकतं. असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment