‘मुळा’त दोन महिने पुरेल एवढेच पाणी; गेल्या वर्षापेक्षा ७७९६ दलघफू कमी

Published on -

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होतानाचे चित्र आहे, नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात मागीलवर्षी (मे २०२३) १४ हजार ६६५ दशलक्ष घनफूट पाणी होते.

यंदा मात्र धरणात अवघा ६ हजार ८६९ दलघफू एकुण जलसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त जलसाठा हैपाणी अवघे दोन महिने पुरेल एवढेच असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची चिन्ह आहेत.

मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे सिंचनाच्या आवर्तनावर परिणाम झाला. तसेच २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय मुळा विभागाने घेतला. जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा तसेच निळवंडे या धरण प्रकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाणी आहे. प्रशासनाने ३१ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन केल्याचा दावा केला जात आहे. तथापि, तापमानामुळे दैनंदिन होणारी पाण्याची वाफ व झपाट्याने खालावत असलेली पातळी पाहता हे पाणी दोन महिने पुरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. जर यंदा मान्सून लांबणीवर पडला तर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे.

पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे

१२ प्रकल्पात ५.९ टीएमसी उपयुक्त पाणी

जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, मांडओहळ, घा. पारगाव, घोड, सीना, खैरी, विसापूर, मुसळवाडी, टाकळी भान या १२ प्रकल्पांत मागील वर्षी मे महिन्यात २२.१ टिएमसी उपयुक्त जलसाठा होता. १४ मे रोजी या सर्व प्रकल्पांत अवघा ५९ टिएमसी एवढाच वापरायोग्य जलसाठा शिल्लक आहे.

पिण्यात्त्या पाण्याचे नियोजन

शेती सिंचनासाठीचे आवर्तन पूर्ण झाले आहे. आम्ही पिण्याच्या पाण्याचे नियोजन आखले असून ३१ जुलैपर्यंत पिण्याचे पाणी पुरणार आहे. धरणातील जलसाठा पाहता नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा

दररोज ५.६८ दलघफू वाफ

तापमानाचा पारा मागील काही दिवसांत ४० अंशावर पोहोचला होता, त्यामुळे मुळा धरणातील पाण्याची वाफ होत आहे. सद्यस्थितीत दररोज ५.६८ दलघफू पाण्याचे बाष्प होत आहे. एप्रिल व मे महिन्यात बाष्पीभवनाचा वेग दररोज सुमारे एक ते दिड दलघफूने वाढल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

धरणनिहाय तुलनात्मक उपयुक्त पाणी

भंडारदरा

■२०२३:५४.१५ टक्के
■२०२४ : १६,५ टक्के निळवंडे
■ २०२३:५४.६ टक्के
■२०२४:१६, ३२ टक्के

मुळा

■ २०२३ : ४७.२७ टक्के
■ २०२४ : २६.४२ टक्के

घोड

■ २०२३-३.३१ टक्के
■ २०२४:२.३६ टक्के

सिना

■ २०२३ : ३.१३ टक्के
■ २०२४:० टक्के

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News