Ahmednagar News : मोबाईलसाठी पैसे न दिल्याने शिक्षकाच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल, २३ दिवस मृत्यूशी झुंज.. अखेर मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar News : समाजात अनेक हृदयद्रावक घटना घडतात. यातील काही अत्यंत मनाचा ठाव घेणाऱ्या तर काही काळीज सुन्न करणाऱ्या असतात. अशीच एक मन सुन्न करणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे.

महागडा मोबाइल फोन घेण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने विषारी औषध घेतले. त्याच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. २३ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी (दि.१८) सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. गजानन उगले (वय २३, रा. नायगाव, ता. जामखेड) असे मयत मुलाचे नाव आहे.

मयत गजानन उगले याचे वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये एका नामांकित शाळेत शिक्षक आहेत. गजानन याने वडिलांकडे महागडा मोबाइल घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र ते पैसे न दिल्याच्या रागातून गजानन उगले याने २८ एप्रिल रोजी विषारी औषध प्राशन केले होते. त्याच्यावर २३ दिवसांपासून जामखेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

गजानन याच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत होती. तसेच त्याला दोन दिवसांपूर्वी घरी सोडण्यात येणार होते. मात्र शनिवारी सायंकाळी ६ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाइकांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ही घटना खर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्याची नोंद खर्डा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मनाविरुद्ध काही घडले किंवा हट्ट पूर्ण झाला नाही म्हणून मुलांमध्ये चिडचिडेपणा किंवा आक्रमकपणा जास्त येत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत.

नैराश्यतेतून किंवा इतर काही कारणातून आत्महत्येचे प्रमाण जास्त वाढल्याची काही उदाहरणे देखील पाहायला मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe