घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत.
आज आपण जाणून घेवूयात मासाल्याचे फायदे…
चीनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून दोन किंवा अधिक वेळा मसालेदार आहाराचे सेवन करतात, त्यांचा अवेळी मृत्यू होण्याचा धोका १० टक्क्यांपर्यंत कमी असतो.
एका संशोधनानुसार, २ ग्रॅम आल्याचा रस नियमित पिण्याने आतड्याचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.
मसाल्यांचे इतरही अनेक फायदे – मसाले कॅलरी खर्च होण्यास मदत करतात, त्यामुळे आपोआपच वजन कमी होण्यास मदत होते.
मसाल्यामुळे चयापचयाची क्रिया वेगवान होते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचतं. छातीमधील आखडलेपण कमी करतात.
रोगप्रतिकार क्षमता सुधारून सर्दी खोकल्यापासून लढण्यास मदत करतात. मसाल्यांच्या सेवनामुळे पाचक एंझाइम्स वाढतात.
थंडीच्या दिवसात रक्तनलिका आकुंचन पावतात. मसाल्यांच्या सेवनामुळे नलिका सामान्य होण्यास मदत होते.
मसालेदार भोजन मूड चांगला करणारे हार्मोन एंडोरफिन आणि सेरोटोनिनचा स्तर वाढवते.
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी
- तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..