एफआरपीची रक्कम थकवल्याने जिल्ह्यातील ‘ह्या’ कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील खासगी मालकीचा युटेक शुगर हा साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम थकवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी: गळीत हंगाम 2019-20 मध्ये या कारखान्याने 38 हजार 685 मेट्रीक टनाचे ऊस गाळप केले.

कारखान्याची या हंगामाची निव्वळ एफआरपी रक्कम 2 हजार 166 रुपये 46 पैसे इतकी आहे. एफआरपी रकमेच्या एकूण देय रकमेपैकी 4 कोटी 61 लाख 57 हजार या कारखान्याने गळीत हंगाम संपून सहा महिने झाले तरी थकविले होते.

त्यामुळे शेतकर्‍यांच्यावतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार साखर आयुक्त पुणे शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना कारखान्याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश दिले आहेत.

ऊस (नियंत्रण) आदेश 1966 चे कलम 3 (8) अन्वये युटेक शुगर लि. कौठे मलकापूर, ता. संगमनेर या कारखान्याकडील गाळप हंगाम 2019-20 मधील उसाची थकित एफआरपी रक्कम रुपये 4 कोटी 61 लाख 57 हजार तसेच कलम 3

(3 ए) नुसार 15 टक्के दराने देय होणारे व्याज या रकमा या कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादीत केलेल्या साखर,

मोलासेस, बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करुन त्यामधून सदर रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद करावी.

सदर मालमत्तेची जप्ती करुन त्याची विहीत पध्दतीने विक्री करुन या रकमेतून ऊस (नियंत्रण) आदेश 1966 मधील तरतुदीनुसार देय बाकी रकमेची खात्री करुन संबंधितांना विलंबीत कालावधीसाठी 15 टक्के व्याजासह अदा करण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment