भयंकर! चीनमधून आलाय पुन्हा ‘हा’ व्हायरस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- भारतासह संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या संकटात सापडले असताना, आता आणखी एका चीनच्या व्हायरसचा जगावर धोका निर्माण झाला आहे. 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सरकारला इशारा दिला  आहे की चीनचा कॅट क्यू व्हायरस देशात पसरू शकतो. या व्हायरसमुळे ताप, मेंदूज्वर असे आजार होऊ शकतात.

आयसीएमआरने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या संशोधनात या आजाराचा उल्लेख केला आहे. हा आजार डास चावल्याने पसरतो आणि यामुळे मानवाला मेनेजाइटिस सारखा आजार जडू शकतो.

लहान मुलांनाही याचा सर्वाधिक धोका असून यामुळे डोक्यात ताप जाऊन इजा होऊ शकते. भारतात आढळणारे डास हा आजार वेगाने पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतात.

या व्हायरसचे प्राथमिक वाहक डुक्कर असल्याचेही आयसीएमआरने सांगितले. एका मीडियाच्या वृत्तानुसार, आयसीएमआरच्या पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरॉलजीच्या 7 संशोधकांनुसार,

चीन आणि व्हिएतनाममध्ये कॅट क्यू व्हायरस आढळला आहे. तेथे डास आणि डुक्करांमध्ये व्हायरस आढळला आहे. भारतात क्यूलेक्स डासांमध्ये कॅट क्यू व्हायरससारखेच काही आढळले असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment