Sarkari Tender Process: तुम्हाला घ्यायचे आहे का सरकारी टेंडर? काय आहे सरकारी टेंडर मिळवण्याची प्रक्रिया? वाचा माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

Sarkari Tender Process:- सरकारच्या माध्यमातून अनेक छोटे-मोठे प्रकल्प राबवले जातात व या पद्धतीने प्रकल्पाची कामे पूर्ण करण्याकरिता टेंडर काढले जातात व ही टेंडर घेणाऱ्या कंपन्यांना किंवा व्यक्तींना त्या कामाचे टेंडर मिळते व संबंध प्रकल्प पूर्ण करण्याच्या जबाबदारी मिळते.

जर आपण आता गव्हर्मेंट टेंडर प्रक्रिया पाहिली तर ती संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीची झाली असून याकरिता ई-टेंडर दाखल करावे लागते. परंतु ई टेंडर दाखल करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते व त्या बाबी महत्त्वाच्या देखील असतात. त्यामुळे ई टेंडर घेण्यासाठी किंवा सरकारी टेंडर देण्यासाठी काय करावे लागते व त्याची प्रक्रिया कशी असते याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

सरकारी टेंडर घेण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या

1- डिजिटल स्वाक्षरी- टेंडर साठी डिजिटल स्वाक्षरी ही तुमची ऑनलाईन ओळख असते व ते खूप महत्त्वाचे असते. याकरिता सगळ्यात अगोदर तुम्ही टीसीएस किंवा ई मुद्रा सारख्या अधिकृत संस्थांकडून तुमचे डिजिटल स्वाक्षरी मिळवून घेणे गरजेचे आहे.

2- ऑनलाइन नोंदणी करावी- जितके सरकारचे ई-टेंडरिंग प्लॅटफॉर्म आहे त्यावर तुमची नोंदणी करणे आवश्यक असते. त्यामध्ये तुम्हाला जो प्लॅटफॉर्म वापरायचा असेल त्याचे निवड करावी व त्या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी.

3- या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष द्या- तुम्हाला जर सरकारी टेंडर घ्यायचे असेल तर त्या अगोदर त्यासाठी आवश्यक पात्रता तसेच निकष आणि आवश्यक त्या टेंडर दस्तऐवजांचा व्यवस्थित अभ्यास करून घ्यावा व संबंधित टेंडर करिता तुमची कंपनी पात्र आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

ई-टेंडर कसे सबमिट किंवा सादर करावे?

1- योग्य टेंडर शोधावे- तुम्ही ज्या सरकारी प्लॅटफॉर्मवर नोंदणी केलेली आहे त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन लॉगिन करावे आणि फिल्टर वापरून तुम्हाला हव्या त्या योग्य टेंडरचा शोध घ्यावा.

2- माहिती डाऊनलोड करावी- प्लॅटफॉर्मवर टेंडरचा शोध घेत असताना तुम्हाला योग्य असे टेंडर सापडले किंवा आढळले की ठिकाणी तपशीलवार माहिती आणि सबमिशन सूचनांसह संपूर्ण टेंडर दस्ताऐवज डाऊनलोड करा.

3- बोली तयार करणे- टेंडरच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून विजयी बोली दस्तावेज तयार करा व यामध्ये वेगळे तांत्रिक व आर्थिक प्रस्ताव असण्याची शक्यता असते.

4- टेंडर वेळेमध्ये सबमिट करावे- अंतिम तारखेपूर्वी तुमचे संपूर्ण बोली आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करावी व सर्व काही योग्यरीत्या फॉरमॅट केलेले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

5- पेमेंट भरणे- काही टेंडरमध्ये प्लॅटफॉर्मचा पेमेंट गेटवेचा वापर करून शुल्क किंवा डिपॉझिट चे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करून घेणे गरजेचे असते.

कसे मिळवाल टेंडर?

1- टेंडर सबमिट करताना आवश्यक मुहूर्त चुकवू नका. ते उशिरा करू नका.
2- सर्व माहिती तपासून घ्या व अपलोड केलेली सर्व कागदपत्रे अचूक व पूर्ण आहेत याची खात्री करून घ्यावी.
3- टेंडर सादर करताना जर एखाद्या गोष्टींवर स्पष्टीकरण हवे असेल तर टेंडर प्रसिद्ध करणारे जे काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्या संवाद चॅनलचा वापर करावा.
4- नवीन टेंडर मध्ये संधी मिळाव्या याकरिता टेंडर वेबसाईट नियमितपणे तपासत रहा.
5- तुमच्या उद्योगातील टेंडरकरिता अलर्ट सुरू करा.
6- ई टेंडरिंग पोर्टल वर तुमचे प्रोफाईल अपडेट ठेवणे गरजेचे आहे.
अशा पद्धतीने तुम्ही जर सोप्या सूचनांचे पालन केले तर विश्वासाने तुम्ही ई टेंडरच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करून यशस्वी होऊ शकतात.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe