Ahmednagar Politics : ठरलं ! विखे राहुरीतून तर कर्डीले ‘येथून’ आमदारकीसाठी उभे राहणार? ‘ही’ व्यूहरचना अनेक दिग्गजांना घरी बसवणार

Published on -

Ahmednagar Politics : लोकसभा संपताच आता आगामी विधानसभेचे गणिते जुळण्यास सुरवात झाली आहे. शरद पवार गटाचा आज अहमदनगरमध्ये रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आहे. परंतुयातून विधानसभेची बीजे रोवतील यात शंका नाही.

दरम्यान लोकसभेतील पराभवानंतर आता विखे कुटुंबीय देखील नव्याने सक्रिय झाले आहे. त्याचप्रमाणे आता त्यांची आगामी विधानसभेला काय चाल असेल याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

दरम्यान आता विखे घराण्यातील एक चेहरा राहुरी मतदार संघातून आमदारकीसाठी उभा राहील अशी चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तनपुरेंविरोधात थेट विखे कुटुंबातील उमेदवार उभा राहू शकतो, अशी ‘प्रवरे’तूनच कुजबूज सुरू असल्याची चर्चा आहे.

तनपुरे-विखे लढतीची शक्यता ?
आगामी विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदार संघातून तनपुरेंच्या विरोधात विखे कुटुंबातील चेहरा पहायला मिळू शकतो, अशी भाजपाच्या अर्थात विखेंच्या गोटातून चर्चा सुरू आहे. त्यामुळे असे झालेच तर शालिनीताई विखे पाटील, धनश्री विखे पाटील किंवा थेट सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या लोक करू लागले आहेत.

माजी आ. शिवाजी कर्डिलेंचे काय?
राहुरी मतदार संघातून शिवाजी कर्डीले हे उभे होते. तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला. परंतु आता राहुरीमधून विखे उभे असतील तर कर्डीले यांचे काय? अशी चर्चा सुरु असतानाच आता माजी आ. शिवाजी कर्डीले हे श्रीगोंदे मतदार संघातून उभे राहतील अशी चर्चा सुरु झाली आहे.

विखे कर्डिलेंची एकमेकांना मदत
शिवाजी कर्डीले यांचे राहुरीमध्ये अनेक गावात वर्चस्व आहे. विखे कुटुंबियांचे तर येथे राजकीय वर्चस्व अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे येथे कर्डीले-विखे ताकद एकत्र आली तर विखे यांना फायदाच होईल. दुसरीकडे श्रीगोंदेत विखेंयांचे राजकीय संबंध चांगले आहेत. त्यामुळे तेथे विखे यांनी कर्डीलेयांना मदत केल्यास तेथे त्यांची ताकद वाढेल अशी चर्चा आहे.

तनपुरेंचीही ताकद मोठी
राज्याच्या राजकारणात काँग्रेस, उबाठा गटासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाची अवस्था अत्यंत चिंताजनक होती. त्यावेळी मोजक्या निष्ठावंतांनी शरद पवारांना साथ दिली. यात राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे देखील पुढे होते. त्यांच्यावर लोकसभेसाठी नगर आणि नाशिक जिल्ह्याची जबाबदारी दिली होती.

त्यांनी आपल्या व्यूहरचनेतून नीलेश लंकेंना स्वगृही आणण्यात यश मिळवले. खासदार सुजय विखे पाटील यांच्याविरोधात तनपुरेंनी मोट बांधून लंकेंना विजयापर्यंत पोहचवले. तसेच नाशिकमध्येही मविआला मोठे यश मिळवून दिले. त्यामुळेच नगरमधील लंकेंच्या विजयात तनपुरे ‘किंगमेकर’ ठरल्याचे पोस्टर झळकले.

या यशामुळे तनपुरेंचे राज्याच्या राजकारणातही वजन वाढल्याचे दिसते. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा सलग २५ वर्ष घोडदौड करणारा वारू रोखला होता.

विखे-कर्डिलेंची खेळी अनेकांना घरी बसवणार ?
जर विखे कर्डीले हे राहुरी, श्रीगोंदे मधून उतरले व जिल्ह्यात दोघांची ताकद व ‘सोधा’ चे राजकारण (सोयऱ्याधायऱ्यांचे) झाले तर विधानसभेला अनेक दिग्गज घरी बसतील अशी चर्चा देखील लोक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe