Ahmednagar News : श्रीगोंदे बाजार समितीतील कोट्यवधींच्या घोटाळ्याचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार

Published on -

Ahmednagar News : बोगस कांदा अनुदान लाटण्याच्या उद्देशाने संगनमताने शासनाची १ कोटी ८८ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे पत्र श्रीगोंदा पोलिसांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे. थेट अटकेची कारवाई करण्यापूर्वी आरोपींची पुन्हा एकदा चौकशी होईल व नंतरच निर्णय घेऊ, अशी माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली.

जिल्हा विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था) राजेंद्र निकम यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यासह सोळा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबतची तक्रार टिळक भोस यांनी दिल्यानंतर पोलीस याप्रकरणाची चौकशी करीत होते.

वरिष्ठांशी चर्चा करून त्यांचा आदेश प्राप्त झाल्यावरही गुन्ह्यातील तपासण्यात वेळ गेला. आता आरोपींच्या अटकेबाबतही चौकशी करूनच कारवाई होणार असल्याची माहिती समजते. आता हा तपासच वर्ग करावा, असाही पत्रव्यवहार माहिती आहे. याबाबत पोलीस निरीक्षक भोसले म्हणाले, आरोपींना अटक करण्याची कार्यवाही नक्कीच होणार आहे.

तथापि हा गैरव्यवहाराचा गुन्हा असल्याने यात आरोपींना लगेच अटक करण्याची गरज नसते. त्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. आरोपींना अटक करण्यापूर्वी आम्ही पुन्हा एकदा चौकशी करू, संबंधीतांचे जबाब घेऊ आणि नंतर त्यावर निर्णय करणार आहोत. शिवाय हा सगळा विषय आर्थिक गुन्हे शाखेशी संबधीत असल्याने गुन्हा त्यांच्याकडे वर्ग करण्याची मागणी पत्राद्वारे आम्ही जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे अशी माहिती त्यांनी दिल्याची माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News