Ahmednagar News : आधी रिचार्ज मग वीज ! चार महिन्यांत तुमच्या घरात येणार प्रीपेड स्मार्ट मीटर, प्रक्रिया सुरु

Published on -

Ahmednagar News : आपल्या घरात असणाऱ्या विजेच्या मीटर संदर्भात एक महत्वाची बातमी आली आहे. सध्या आपल्या घरात जे मीटर आहे त्याची जागा लवकरच आता प्रीपेड स्मार्ट मीटर घेणार आहे. ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर हा विनामूल्य मिळणार असून हा खर्च केंद्र सरकार व महावितरण करणार असल्याची माहिती समजली आहे.

नागरिकांना आता यामुळे मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही जितके रिचार्ज कराल तितकी वीज तुम्हाला वापरता येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात ६ लाख ३६ हजार १९२ ग्राहक आहेत. त्या सर्वांचे मीटर बदलले जाणार आहे.

नागार्जुन कन्स्ट्रक्शन लिमिटेड
जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ७९७.३८ कोटींच्या खर्चाची निविदा प्रक्रिया होऊन नागार्जुन कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना ७ ऑगस्ट २०२३ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. कामाचा कालावधी २७ महिन्यांचा आहे.

शेतीचे वीजग्राहक वगळता घरगुती, व्यापारी, औद्योगिक वीजग्राहकांसह फीडर व रोहित्रांवर सुद्धा स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. त्यादृष्टीने ठेकेदाराने फीडर व रोहित्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.

ग्राहकांना मोबाईल फोनवर मिळेल माहिती
ज्या पद्धतीने आपण मोबाईलला रिचार्ज करतो त्या पद्धतीने स्मार्ट मीटरला रिचार्ज करावे लागणार आहे. ग्राहकांना मोबाईलवर किती वीज वापरली, किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनानुसार वीज वापर किती करायचा हेसुद्धा ग्राहकांना समजणार आहे.

सध्याच्या पद्धतीत मीटर रिडींग घेऊन मोठे बिल आल्यावर ग्राहकांचे गणित बिघडते. स्मार्ट मीटरमुळे वीज वापरावर ग्राहकांना नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. ग्राहकांना घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन स्मार्ट मीटरवर पैसे भरण्याची सुविधा आहे. पैसे संपत आल्यावर दोन दिवस अगोदर मोबाईलवर संदेश मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News