… अन्यथा विखे-पाटलांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही ; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा इशारा

Ahmednagar Politics : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन भरकटत चालले आहे. जरांगे पाटील हे एकटे म्हणजे मराठा समाज नव्हे, असे वक्तव्य केले होते.

त्यानंतर त्यांच्याविरुद्ध स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला असून, मंत्री विखे-पाटलांना लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या मुलाला निवडून आणता आले नाही. त्यांनी असली बेताल वक्तव्यं करु नयेत. अन्यथा विखे-पाटलांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसारकर यांनी दिला.

महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले होते. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारी स्तरावर चर्चा सुरु आहे. त्यामुळे काहीतरी मार्ग निघेल. लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडले.

मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे. मनोज जरांगे यांचे आंदोलन आता भरकटत चालले आहे. आम्हीसुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले होते.

त्यावर लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या मुलाला निवडून आणता आले नाही. त्यांनी असली बेताल वक्तव्यं करु नयेत. अन्यथा विखे-पाटलांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसारकर यांनी दिला.

दरम्यान विखे यांच्या वक्तव्यावर मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणे बंद केले पाहिजे, तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल त्यामुळे तुम्ही लवकर शहाणे व्हा असा सल्ला त्यांनी मंत्री विखे यांना दिला आहे. शिवाय मी जातीवादी नसून राज्यात जे काही होतोय ते भुजबळ घडवून आणतायेत असा घणाघात देखील मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे आता या पुढील काळात विखे पाटील यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.

 

जालना जिल्ह्यात झळकला गावबंदीचा बॅनर !

लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनानंतर जालना जिल्ह्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. ओबीसी नेता सोडता अन्य नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात या आशयाचा फलक लावला आहे. जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे. ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.