शेवगावातील ट्रेडर्स हजारो कोटी घेऊन पळाले ! आता आ. मोनिका राजळे ऍक्शनमोड वर, केले ‘असे’ काही

मागील काही महिन्यात शेअर ट्रेडर्सकडून सर्वसामान्य जनतेबरोबर बड्या लोकांचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक लोक फसले गेले. परंतु यासंदर्भामधे एक ट्रेडर्स सोडता कुणावरही पोलिसांकडून अॅक्शन घेण्यात आली नाही.

Ahmednagarlive24 office
Published:
fadnvis

Ahmednagar Politics : मागील काही महिन्यात शेअर ट्रेडर्सकडून सर्वसामान्य जनतेबरोबर बड्या लोकांचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक लोक फसले गेले. परंतु यासंदर्भामधे एक ट्रेडर्स सोडता कुणावरही पोलिसांकडून अॅक्शन घेण्यात आली नाही.

याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी गुरुवारी (ता.४) विधानभवनात प्रश्न उपस्थित करीत वाचा फोडण्याचे काम केले आहे. बनावट शेअर मार्केट व्यावसायिकांनी गुंतवणूकदारांची एक ते दीड हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याबाबत आ. मोनिका राजळे यांनी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला असून, यात अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.

शेवगाव-पाथर्डी तालुक्यासह परिसरातील १५ ते २० हजार नागरिकांनी तालुक्यात अनेक बनावट शेअर मार्केट व्यावसायिकांकडे सुमारे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जास्त व्याजाच्या आमिषाने दलालांमार्फत यातून भरमसाट पैसा गोळा केला आहे.

या बनावट शेअर ट्रेडिंगमध्ये अडकलेले नागरिकांचे पैसे परत मिळावे, यासाठी आ. राजळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन सर्वसामान्यांचे पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे. शेअर मार्केटमधून एका लाखाला महिन्याला १० ते १७ हजार रुपये महिना व्याज मिळून देतो, अशी बतावणी करून एकाचे फगले म्हणून दुसरा, तिसरा अशी अनेक दुकाने शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागासह इतरत्र थाटण्यात आली.

लोकांचा विश्वास बसावा यासाठी महिन्याला नियमित व्याज देखील देण्यात आले. परंतु, ही सर्व प्रक्रिया राबवत असताना तीन ते चार महिन्यांनंतर व्याजाला विलंब, तर काहींनी पैसे नसल्याने विष घेण्याचा प्रयत्न केला. एकाने दिले नाही म्हणून दुसरा तिसरा असे एक-एक करीत १० ते १५ व्यक्ती कोट्यवधी रुपये घेऊन रात्रीतून कुटुंबासह फरार झाले.

त्यामुळे आर्थिक फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने हजारो गुंतवणूकदार रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन, मोर्चा, निवेदनाद्वारे फसवणूक करणाऱ्या शेअर मार्केट ट्रेडिंग चालक व दलालावर गुन्हे दाखल करण्याची मागणी झाल्याने याबाबत एक-दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

यातील गुन्हेगारांचा छडा लावण्यात यावा व गुंतवणूकदारांना गुंतवलेले पैसे परत मिळावेत. पोलिसांनी गुन्हे दाखल न केलेल्या इतर शेअर मार्केट ट्रेडिंग चालक व दलालांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि तत्काळ योग्य तपास करून त्या व्यावसायिकांच्या मालमत्ता जप्त कराव्यात व त्यातून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवून देण्याची मागणी आ. राजळे यांनी निवेदनात केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe