भारतीय बाईक बाजारपेठेत घडली नवक्रांती! बजाजने पुण्यात लाँच केली सीएनजी बाईक; वाचा तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये आणि किती आहे किंमत?

Ajay Patil
Published:
bajaj cng bike

सध्या बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांचा बोलबाला मोठ्या प्रमाणावर असून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून या वाहनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु यामध्ये संपूर्ण जगाच्या पाठीवर सीएनजी प्रकारात अनेक वाहने आहेत.

परंतु अजूनपर्यंत सीएनजी बाईक मात्र कुठल्याही कंपनीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली नव्हती. परंतु ही कमी बजाज ऑटोने पूर्ण केली असून त्यांनी नुकतीच पुण्यात जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे या बाईकचा लॉन्चचा सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. साधारणपणे 125cc चे इंजिन असलेली ही बाईक नक्कीच महत्त्वाची ठरेल.

 या सीएनजी बाईकमध्ये काय असणार खास?

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही बाईक 125cc इंजिन क्षमता असलेली बाईक आहे.

2- या बाईकला दोन किलो सीएनजीची टाकी देण्यात आली आहे.

3- तसेच या बाईकमध्ये जी सीएनजीची टाकी देण्यात आली आहे ती सीटच्या खाली बसवण्यात आली आहे.

4-  सीएनजी टाकीच्या स्ट्रक्चर करिता या बाईकमध्ये सीट हे पेट्रोल टाकीच्या वरपर्यंत देण्यात आले आहे.

5- महत्वाचे म्हणजे सीएनजी टाकीसोबतच या बाईकमध्ये दोन लिटरची पेट्रोल टॅंक देखील देण्यात आली आहे.

6- या बाईकचे सरासरी मायलेज 230 किलोमीटर आहे व हे मायलेज पेट्रोल आणि सीएनजीच्या माध्यमातून मिळू शकेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

7- या बाईकचे नाव कंपनीच्या माध्यमातून बजाज फ्रीडम असे ठेवण्यात आले आहे.

 किती आहे या बाईकची किंमत?

बजाजने लॉन्च केलेली सीएनजी बाईक ही तीन वेगवेगळ्या अशा मॉडेल्समध्ये असणार असून यामध्ये साधारणपणे मॉडेल्स नुसार तिची किंमत अनुक्रमे 95 हजार, एक लाख पाच हजार आणि एक लाख दहा हजारांच्या आसपास असणार आहेत. लवकरच ही बाईक बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe