FD Interest Rates : देशातील दुसरी सर्वात मोठी ICICI बँकेने, FD वरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ICICI बँकेचे नवीन दर 8 जुलै 2024 पासून लागू झाले आहेत. बँकेने 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी व्याजदर वाढवले आहेत.
नवीन व्याजदरानुसार बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक 7.70 टक्के व्याजदर देत आहे. सामान्य लोकांसाठी FD वर सर्वाधिक व्याजदर 7.2 टक्के पर्यंत आहे. बँकेने विविध कालावधीसाठी लागू केलेले व्याजदर खालिलप्रमाणे :-
आयसीआयसीआय बँक एफडी व्याजदर
7 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
91 दिवस ते 184 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
121 दिवस ते 150 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
151 दिवस ते 184 दिवस: सर्वसामान्यांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
185 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.70 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.20 टक्के
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के
18 महिने ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.70 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.40 टक्के.