भारतीय बाजारपेठेमध्ये सध्याच्या कालावधीत इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटर तसेच इलेक्ट्रिक बाइक्स आणि इलेक्ट्रिक कार्स सादर केल्या जात असून इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत ग्राहकांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न या वाहन कंपन्यांच्या माध्यमातून केले जात आहेत.
यामध्ये भारतातील बाईक उत्पादक कंपन्या जसे की,बजाज ऑटो तसेच हिरो मोटो कॉर्प यासारख्या महत्त्वाच्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणावर उत्पादित केलेले आहेत.

परंतु आता या सगळ्या धामधुमीत रॉयल एनफिल्डने देखील प्रवेश केला असून कंपनी लवकर इलेक्ट्रिक बुलेट मार्केटमध्ये आणणार आहे व या इलेक्ट्रिक बुलेटचे डिझाईन देखील लीक झाले आहे. साधारणपणे रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बुलेट या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी ऑटो एक्सपो 2025 मध्ये सादर करेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रॉयल एनफिल्डच्या पहिल्या इलेक्ट्रिक बुलेटमध्ये असतील खास वैशिष्ट्ये
जर आपण लीक झालेले या इलेक्ट्रिक बाइकचे डिझाईन पाहिले तर रॉयल एनफिल्डच्या सध्याच्या ज्या काही बाईक आहेत त्यापेक्षा ती स्लिम असेल असे दिसते. तसेच ही बाईक क्रूज लुकमध्ये येण्याची शक्यता दिसून येत आहे.
तसेच रॉयल एनफिल्डचे हे नवीन इलेक्ट्रिक मॉडेल कंपनीच्या 350cc श्रेणीच्या ज्या बाईक्स आहेत त्यांना समान शक्ती देईल. एवढेच नाही तर हे नवीन मॉडेल नवीन फ्रेम वर आधारित असणार आहे व त्यामुळे दिसायला ती स्टायलिश दिसेलच परंतु तिचा परफॉर्मन्समध्ये देखील उत्तम फरक जाणवणार आहे. तसेच या इलेक्ट्रिक बुलेट मध्ये सिंगल सीट असणार आहे व ते आरामदायक असणार आहे.
आपण या बाईकचे डिझाईन पाहिले तर यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरी पॅककरिता देखील हीच फ्रेम वापरली जाईल असा अंदाज लावता येऊ शकतो. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये जे मोटर युनिट वापरले जाणार आहे ते दिसणार नाही व त्यामुळे बाईकचा लुक आणखी इम्प्रू होण्यास मदत होईल.
असतील हे इतर वैशिष्ट्ये
तसेच उत्तम ब्रेकिंगकरिता या बाईकमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि दोन्ही टायरमध्ये डिस्क ब्रेकची सुविधा असणार आहे. तसेच बेल्ट ड्राईव्ह बाईकच्या उजव्या बाजूला असेल. रॉयल एनफिल्डच्या या बाईचे जे काही डिझाईन आहे त्याचे पेटंट उपलब्ध असल्यामुळे लवकरच रॉयल एनफिल्ड कडून या इलेक्ट्रिक बाइकचे लॉन्चिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच या बाईकची संपूर्ण रचना क्लासिक शैलीत असण्याची शक्यता आहे. यामध्ये गोल हेडलाईट व टर्न इंडिकेटर आणि ORVM सारखे फीचर्स देखील मिळू शकतील. याशिवाय डिजिटल स्पीडोमीटर असणार असून जे कनेक्ट केलेल्या वैशिष्ट्यांसह सज्ज असणार आहे. याशिवाय हाय स्पीड अलर्ट, ब्लूटूथ, नेव्हिगेशन यासारखे फीचर्स देखील मिळू शकतात.