Bank Home Loan : ‘या’ बँका देतायेत सर्वात स्वस्त गृहकर्ज, चेक करा लेटेस्ट रेट

Ahmednagarlive24 office
Published:
Bank Home Loan

Bank Home Loan : अनेक लोकांसाठी घर विकत घेणे हे आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न असते. पण प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होईलच असे नाही. महागाईच्या या जमान्यात आज प्रत्येकाला घर घेणे सोपे नाही. अशास्थितीत बँका तुम्हाला घर घेण्यास मदत करतात.

बहुतांश बँका सध्या कमी व्याजदरात गृहकर्ज ऑफर करत आहेत. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला कमी दरात गृहकर्ज देत आहेत. जर तुम्ही सध्या घर घेण्याच्या विचारत असाल आणि गृहकर्जासाठी अर्ज करणार असाल तर सर्वप्रथम या बँकांची यादी तपासा.

स्टेट बँक ऑफ इंडिया

प्रथम आपण स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल बोलूया. बँक अर्जदाराच्या CIBIL स्कोअरवर अवलंबून 9.15 टक्के ते 9.75 टक्के व्याजदराने गृहकर्ज देते.

बँक ऑफ बडोदा

तर बँक ऑफ बडोदा गृह कर्जावर 8.40 टक्के ते 10.90 टक्के व्याजदर ऑफर करते.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक कर्जदाराचा CIBIL स्कोअर, कर्जाची रक्कम आणि कालावधी यासारख्या घटकांवर अवलंबून 9.4 टक्के ते 11.6 टक्के पर्यंत व्याजदराने गृहकर्ज देते.

उदाहरणार्थ, CIBIL स्कोअर 800 आणि त्याहून अधिक असलेल्या कर्जदारांना 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसह 30 लाख रुपयांपेक्षा जास्त बँक कर्जासाठी गृहकर्ज 9.4 टक्के सर्वात कमी दराने दिले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe