खासदार लंके यांनी गल्लीबोळात आंदोलने करण्यापेक्षा संसदेत दूध दरवाढीबाबत कायदा करण्यासाठी भांडावे ; ‘या’ शेतकरी नेत्याची टीका

Published on -

Ahmednagar News : नुकतेच पार पडलेल्या लोकसभेत नगर मतदारसंघातून निवडून आलेल्या खा. निलेश लंके यांना जनतेने त्यांच्या समस्या संसदेत मांडण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी गल्लीबोळात आंदोलने करण्यापेक्षा संसदेत दूध दरवाढीबाबत कायदा करण्यासाठी भांडले पाहिजे. शेतकऱ्यांचा एवढा कळवळा असेल तर संसदेत भांडा. अशी टीका शेतकरी नेते संतोष रोहन यांनी केली आहे.

राज्यात पडलेल्या दूधदर वाढीसाठी नुकतीच खासदार निलेश लंके यांनी नगरच्या जिल्ह्याधिकारी कार्यालयावर आंदोलन केले होते. दरम्यान पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेतले. दरम्यान सरकारने दुधाला ३० रुपये लीटर तर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

मात्र सध्या १ लिटर दुधासाठी ४२ ते ४५ रुपये खर्च येतो त्यामुळे हे दर पुरेशे नसल्याने यावर देखील शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे दुधाला देखील हमी भाव देण्यात यावा यासाठी नुकतेच दूध परिषद आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उसाला ज्याप्रमाणे एफआरपी मिळते, त्याप्रमाणे दुधालाही हमी भाव द्यावा. यासाठी शेतकऱ्यांनी देखील दर्जेदार दूध उत्पादन करावे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली. सरकार शेतकऱ्यांना दुधाला हमीभाव देण्याचा कायदा होण्यासाठी कमिटी तयार करून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे उद्योजक साहेबराव नवले यांनी सांगितले.

संगमनेर, अकोले तालुका परिसरातील दूध उत्पादक शेतकरी यांनी दूध परिषदेचे आयोजन केले होते . यावेळी तालुक्यातील अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. अनेक शेतकऱ्यांनी दूध समस्यांबाबत मनोगत व्यक्त केले.

दुधाला सध्या २७ रुपये भाव असून ४२ ते ४५ रुपये खर्च येतो. मुलांचे शिक्षण, घर, गाय, किराणा, कापड, कष्टाचे दाम मिळत नसल्याचाही स्वर या परिषदेमध्ये उमटला. याबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिष्टमंडळ भेटणार असल्याचेही या परिषदेमध्ये ठरले.

दुधाला भाव मात्र मिळत नसल्याने त्या तरुणांमध्ये नाराजी उमटली आहे. किमान ४० रुपये भाव मिळाला पाहिजे. दूध, ऊस, आणि पाणी या प्रश्नावर अनेकवेळा आंदोलने केली आहेत. मात्र आता दुधातील भेसळ ओळखली पाहिजे.

याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे नवले यांनी म्हटले. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटणार नसेल तर आपण आमरण उपोषण करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe