SBI Home Loan Rate : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. SBI ने आज आपल्या MCLR कर्जाच्या दरात वाढ केली आहे. MCLR हा असा दर आहे ज्यावर बँक ग्राहकाला कमी व्याजदराने कर्ज देऊ शकत नाही. SBI बँकेने MCLR दरात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. MCLR चे नवीन सुधारित दर आज 15 जुलै 2024 पासून लागू झाले आहेत.
आता SBI चा बेस लँडिंग रेट म्हणजेच MCLR 8.10 वरून 9 टक्के झाला आहे. एका रात्रीचा MCLR दर 8.20 टक्के झाला आहे. SBI ने MCLR मधील दर 0.05 टक्क्यांवरून 0.10 टक्के केला आहे. MCLR दर वाढल्याचा थेट परिणाम तुमच्या घर आणि कार कर्जाच्या EMI वर होतो. MCLR दर वाढल्यामुळे नवीन कर्ज देखील महाग झाले आहे तसेच तुमच्या सध्याच्या लोनचे EMI वाढते.
SBI अजूनही ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत इतर सर्व बँकांपेक्षा खूप पुढे आहे. SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. SBI ने MCLR मध्ये वाढ केल्यामुळे, त्याची विविध कर्ज उत्पादने महाग होऊ शकतात. यामुळे लाखो ग्राहकांवर व्याजाचा बोजा वाढू शकतो आणि त्यांना जास्त ईएमआय भरावे लागू शकतात.
अशा प्रकारे MCLR दर ठरवला जातो?
MCLR ठरवताना अनेक बाबी विचारात घेतल्या जातात. यामध्ये ठेव दर, रेपो दर, ऑपरेशनल कॉस्ट आणि कॅश रिझर्व्ह रेशो कायम ठेवण्याचा खर्च समाविष्ट आहे. रेपो दरातील बदलांचा MCLR दरावर परिणाम होतो.
MCLR मधील बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात, ज्यामुळे कर्जदारांचा EMI वाढते. कार कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा EMI वाढेल. MCLR मधील वाढ आणि घट गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यासह सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांवर परिणाम करते. MCLR वाढल्यामुळे कर्ज ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त EMI भरावे लागणार आहे. त्यात वाढ झाल्याने नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनाही महागडे कर्ज मिळणार आहे.