‘मोक्कातील आरोपीचे विखेंच्या नावाने कार्यालय..’ , सुजय विखेंचाही थेट इशारा

अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगेलच तापायला सुरवात झाली आहे. आता माजी खा. सुजय विखे यांच्यावर विरोधकांनी घणाघाती आरोप केला आहे. त्यास विखे यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगेलच तापायला सुरवात झाली आहे. आता माजी खा. सुजय विखे यांच्यावर विरोधकांनी घणाघाती आरोप केला आहे. त्यास विखे यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे.

मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या दीपक अंबादास पोकळे याने सूजयपूर्व नावाने संपर्क कार्यालय सुरू केले असून, या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे.

पिपाडा यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन विखे यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले, शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखे यांची दहशत आहे. विखे हे गुंडांना पाठीशी घालत आहेत. मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी दीपक पोकळे व त्याच्या साथीदाराने शिर्डी जवळच्या निमगाव परिसरात सुजयपर्व नावाने संपर्क कार्यालय सुरू केले.

या कार्यालयाचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते झाले. विखे यांच्या नावाने संपर्क कार्यालय सुरू करणारा पोकळे हा गुंड आहे. त्याच्याविरोधात राहाता व लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना विखे पाठबळ देत आहेत असा घणाघाती आरोप त्यांनी केला होता.

माजी खा. सुजय विखे यांचेही सडेतोड प्रत्युत्तर
माजी खा. सुजय विखे याबाबत माध्यमांशी बोलताना म्हणाले, कुणी सर्वसामान्य माणूस येऊन फोटो काढत असेल तर तो कोण आहे हे मला माहीत नाही. लोकप्रतिनिधी नागरिकांसाठी पूर्णपणे उपलब्ध असतो.

कार्यालयात कुणी येऊ शकते. माझ्या नावाचा कुणी गैरवापर करत असेल तर संबंधितांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे विखे पाटील म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe