पारनेरमध्ये आमदारकीला इच्छुकांचा भरणा ! महायुतीकडून ‘हे’ पाच तर माविआ कडून ‘हे’ तिघे इच्छुक

विधानसभा निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. लवकरच सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. महविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाडी युतीत रस्सीखेच दिसणार आहे. याचे कारण म्हणजे इच्छुकांची भरमसाठ मोठी संख्या.

Ahmednagarlive24 office
Published:
political

Ahmednagar Politics: विधानसभा निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. लवकरच सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. महविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाडी युतीत रस्सीखेच दिसणार आहे. याचे कारण म्हणजे इच्छुकांची भरमसाठ मोठी संख्या.

आता पारनेर मतदार संघाचा जर विचार केला तर येथे महायुतीकडून जितकी रस्सीखेच आहे तितकीच महाविकास आघाडीकडूनही राहील. सध्याच्या गणितानुसार महायुतीकडून पाच तर माविआ कडून तिघे इच्छुक उमेदवार आहेत.

महायुतीत ‘या’ पाच जणांत रस्सीखेच
महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या प्रमुख नेत्यांची शनिवारी सुपा येथे बैठक झाली. यावेळी काशिनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड यांनी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे बैठकीत म्हटले आहे.

या बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, माजी सभापती गणेश शेळके, शिंदे सेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहकले, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे आदींसह तीनही घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी व मंत्र्यांनी सभा, बैठका घेऊनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार खासदार नीलेश लंके यांना मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या या प्रमुख नेत्यांनी एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

पवारांकडून दातेंसह झावरे पाटलांनाही विचारणा?
पारनेरमध्ये अजित पवार गटाने दावा केला आहे. अजित पवार यांच्या गटाकडून विधानसभेसाठी काशिनाथ दाते व सुजित झावरे पाटील यांना विचारणा झाल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे.

महाविकास आघाडीकडून तिघे इच्छुक
पारनेर मतदारसंघ शरदपवार गटाकडे जाईल असे म्हटले जात आहे. असे असले तरी शिवसेना ठाकरे गट देखील या जागेवर दावा करत आहे. सध्या महाविकास आघाडीकडून संदेश कार्ले, श्रीकांत पठारे, (दोघे ठाकरे गट) व राणीताई लंके या शरद पवार गटाकडून इच्छुक असल्याची चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe