जिल्हाधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल आहे तरी काय? विखे अडचणीत येतील? पवार-थोरातांच नेमके म्हणणे काय? पहा..

आजी व माजी महसूल मंत्र्यांमधील अर्थात विखे-थोरात वाद जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे वाढताना दिसतील. दरम्यान मागील तीन चार दिवसांपासून सुरु असणारा त्यांचा वाद चांगलाच वाढलेला आहे असे दिसतेय. दरम्यान "भ्रष्टाचाराचे एकही उदाहरण आढळल्यास आपण राजकारणातून बाजूला होऊ.

Ahmednagarlive24 office
Published:
thorat

Ahmednagar Politics : आजी व माजी महसूल मंत्र्यांमधील अर्थात विखे-थोरात वाद जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे वाढताना दिसतील. दरम्यान मागील तीन चार दिवसांपासून सुरु असणारा त्यांचा वाद चांगलाच वाढलेला आहे असे दिसतेय.

दरम्यान “भ्रष्टाचाराचे एकही उदाहरण आढळल्यास आपण राजकारणातून बाजूला होऊ. आरोप सिध्द न झाल्यास तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा” असे आव्हान राज्याचे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना दिले होते. त्यानंतर आता आ. थोरातांनी तलाठी भरती बाबत पुन्हा एक मोठं वक्तव्य केले आहे.

आमदार थोरात यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर तुमचे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को..’ असे झाल्याची खोचक व खरमरीत टीका केल्याने वाकयुध्दाचे रंग अधीकच गडद होण्यास सुरुवात झाली आहे. अहमदनगरमध्ये तलाठी नियुक्तीपत्रे देताना मंत्री विखे यांनी तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे म्हटले होते.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि थोरात यांनी या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. याबाबत भाष्य करताना विखे पाटील यांनी भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा,

असे जाहीर आव्हान आमदार बाळासाहेब थोरात यांना दिले होते. या आव्हानाचा समाचार घेताना आमदार थोरात यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट करत महसूल मंत्री विखे यांना तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…’ असे झाले आहे. असे पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.

काय म्हणाले आहेत थोरात ?
तलाठी भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत जिल्हाधिकाऱ्यांनी अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठविला. त्यावर महसूलमंत्र्यांनी काय कार्यवाही केली, हे देखील जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगावे. शिवाय तलाठी भरतीतील गैरप्रकारांची अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आणली तर तुमचा ‘पारदर्शक कारभार’ उघडा पडेल,

असा टोला आ. बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. तलाठी भरतीत भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले, तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करू शकला नाही, तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असे आव्हान विखे यांनी थोरातांना दिले होते. त्यावर थोरातांनी ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट करत विखे यांना आव्हान दिले आहे.

बाकी प्रश्न राहिला रेटकार्डचा, तर महसूलमधील अधिकाऱ्यांनी आपल्या दोघांचाही कार्यकाळ बघितला आहे, सत्य काय ते सगळ्यांना माहीत आहे. तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…’ असे झाले आहे, अशी कोपरखळीही थोरातांनी लगावली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe