Maniyar Snake: ‘या’ सापापुढे कुठेच नाही लागत कोब्रा! जास्त करून झोपेतच करतो दंश, पुन्हा नाही उघडत व्यक्तीचे डोळे

Ajay Patil
Published:
manyaar snake

Maniyar Snake:- भारतामध्ये आणि जगाच्या पाठीवर अनेक सापांच्या प्रजाती आहेत. परंतु जर जगाच्या आणि भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर यातील बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी वर्गातील असून काही प्रजाती या विषारी आहेत.

यामध्ये भारतातील सापांच्या प्रजाती बघितल्या तर यामध्ये बिनविषारी जाती मोठ्या प्रमाणावर आहेत व सर्वात जास्त विषारी जाती या प्रामुख्याने चार ते पाच आहेत.

भारतामध्ये विषारी जाती बघितल्या तर यामध्ये नाग, मन्यार, घोणस आणि फुरसे या जातींचा समावेश होतो. परंतु या चारही जातींपैकी जर आपण मण्यार सापाची जात बघितली तर ती सगळ्यात विषारी जात समजली जाते.

याबाबतीत तज्ञ म्हणतात की, मण्यार जातीच्या सापाचे जे काही विष असते ते न्यूरोटॉक्सिन प्रकाराचे असते. जर या सापाने चावा घेतला तर व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.

मण्यार आहे सर्वात विषारी साप

मन्यार हा भारतातील विषारी जातींपैकी एक विषारी सापाची जात असून ही जात नागापेक्षा देखील विषारी समजली जाते. या सापाचे विष हे न्यूरोटॉक्सिन प्रकाराचे असते व मानवी शरीरामध्ये ते गेल्यास त्याचा विपरीत परिणाम शरीरातील पेशींवर व्हायला लागतो. तसेच या जातीचा साप जर चावला तरी व्यक्तीला काहीही कळत नाही.

तसेच या सापाचे वैशिष्ट्य जर पाहिले तर तो जास्त करून व्यक्तींना झोपेत असताना चावा घेतो आणि घेतलेला चावा कळत नसल्यामुळे व्यक्तीचा नाहक जीव जाण्याची शक्यता वाढते. मन्यार जातीच्या सापाबद्दल सर्प तज्ञ म्हणतात की, हा एक निशाचर म्हणजेच रात्रीच्या वेळेस फिरणारा साप पासून तो रात्रीच्या अंधारातच बिळा बाहेर पडतो.

यावेळी तो उंदीर तसेच बेडूक व पाली इत्यादींचा खाद्यासाठी शोध घेत असतो. जर हा साप घरामध्ये शिरला तर तो अंधारामध्येच बसून राहतो. या सापाला अंधारे वातावरण आणि शांत वातावरण जास्त आवडते. त्यानंतर तो सरपटत व्यक्ती झोपलेल्या बिछान्याकडे किंवा अंथरुणाकडे जातो.

अशावेळी जर चुकून त्याला धक्का लागला तर मात्र तो चावा घेतो. मण्यार जातीचा साप हा सडपातळ आणि लांबलचक असतो.तसेच इतर वैशिष्ट्यांप्रमाणे जर आपण या सापाच्या आणखी एक वैशिष्ट्य पाहिले तर याचे दात खूप लहान असतात व त्यामुळे जर त्याने दंश केला तरी व्यक्तीला वेदना होत नाहीत.

त्यामुळे हा साप चावला तरी व्यक्तीला  कळत नाही व वेळ हातातून निघून जाते व व्यक्तीचा मृत्यू होऊ शकते. हा साप इतका विषारी आहे किंवा याचे विष एवढे जहाल आहे की जर व्यक्तीला झोपेत या सापाने चावा घेतला तर व्यक्ती झोपूनच राहते. म्हणजे ज्या व्यक्तीचा झोपेतच मृत्यू होतो.

जर आपण सापाच्या रक्ताच्या बाबत बघितले तर सापाचे रक्त शीत असते व त्यामुळे ते उबदा lर जागेच्या शोधामध्ये कायम असतात. त्यामुळे जर साप घरामध्ये घुसला तर तो एखाद्या अंधारातील जागा किंवा अडगडीची जागा असेल त्याठिकाणी लपून बसतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe