नगर उबाठाला तर श्रीगोंदे काँग्रेसला? स्वतः शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर इच्छुकांत खळबळ

निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या अनेक इच्छुक आमदारकीची तयारी करत आहेत. सध्या महाविकास आघाडीचा विचार जर केला तर नगर व श्रीगोंदे येथे शरद पवार गट दावा करेल किंवा ती जागा त्यांनाच मिळेल अशी अपेक्षा होती.

Ahmednagarlive24 office
Published:
politics

Ahmednagar Politics : निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या अनेक इच्छुक आमदारकीची तयारी करत आहेत.

सध्या महाविकास आघाडीचा विचार जर केला तर नगर व श्रीगोंदे येथे शरद पवार गट दावा करेल किंवा ती जागा त्यांनाच मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करत होते.

परंतु आता नगर उबाठाला तर श्रीगोंदे काँग्रेसला सोडण्याबाबत स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीने जिल्ह्यातील नगर शहर व श्रीगोंदा या दोन विधानसभा मतदारसंघांच्या जागा काँग्रेसला द्याव्यात, अशी मागणी जिल्हा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांना यांच्याकडे केली आहे.

त्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, उपाध्यक्ष संपत म्हस्के आदींच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उमेदवार दिल्यास कसे राहील, अशी विचारणा जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे केल्याने नगर शहर काँग्रेस व खुद्द पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.

काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादीकडे इच्छुकांची तयारी जोरात सुरू आहे. अशा स्थितीत जागा जर ठाकरे सेनेला गेली तर आपले काय, असा प्रश्न या इच्छुकांच्या समर्थकांमध्ये आहे. दरम्यान, श्रीगोंदे विधानसभा मतदार संघ काँग्रेससाठी सोडण्यास पवारांनी अनुकूलता दर्शवल्याने त्या मतदार संघातील शरद पवार राष्ट्रवादीचे इच्छुक माजी आमदार राहुल जगताप यांचे समर्थकही अस्वस्थ झाले आहेत.

यावेळी नगर उबाठाच्या पारड्यात नगर शहरात कोणत्या राजकीय पक्षाची कशी स्थिती आहे, याची माहिती पवारांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून जाणून घेतले असल्याची माहिती समजली आहे.नगर शहरात एकास एक लढत झाली तर ती महाविकास आघाडीच्या फायद्याची असेल, असेही पवारांना यावेळी आवर्जून सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe