अजित पवारांचा मास्टरप्लॅन ! बारामती नाही आता नगर जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार; सुपुत्र जय पवारांची बारामतीमधून लॉन्चिंग

विधानसभेच्या निवडणुका आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर मंथन सुरू आहे. सर्वच पक्षात बंद दाराआड उमेदवारांच्या निवडीवरून खलबत सुरू आहे.

Tejas B Shelar
Updated:
Ajit Pawar Vidhansabha Nivdnuk

Ajit Pawar Vidhansabha Nivdnuk : ‘बारामती’ नाम तो सुना ही होगा ! पुणे जिल्ह्यातील हा विधानसभा मतदारसंघ मुंबईच्या सभागृहापासून तर दिल्लीच्या संसदेपर्यंत कायमच चर्चेत राहणारा मतदारसंघ. या मतदारसंघाची नेहमीच चर्चा होते. बारामतीचा मतदार संघ राजकारणातील चाणक्य म्हणून ख्यातनाम असणारे शरद पवार यांच्या पुतण्यांचा बालेकिल्ला. मात्र आता हा बालेकिल्ला लढवण्याची जबाबदारी अजितदादा आपले सुपुत्र जय पवार यांच्याकडे सोपवणार असे दिसत आहे.

स्वतः अजितदादा यांनीच हे संकेत दिले आहेत. यामुळे पुन्हा एकदा बारामती चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी अप्रत्यक्षरीत्या जय पवार बारामती मधून निवडणुकीसाठी उभे राहू शकतात असे संकेत दिले आहेत. यामुळे सध्या अजित दादांच्या या वक्तव्याची संपूर्ण राज्यभर चर्चा आहे.

खरे तर विधानसभेच्या निवडणुका आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर मंथन सुरू आहे. सर्वच पक्षात बंद दाराआड उमेदवारांच्या निवडीवरून खलबत सुरू आहे.

अशा या परिस्थितीत आता अजितदादांनी बारामतीत जय पवार यांना निवडणुकीला उभे करायचे की नाही, याचा निर्णय पक्षाचे कार्यकर्ते आणि संसदीय मंडळ घेईल, असे विधान केले आहे. अजित दादा हे राजकारणातील चाणक्य शरदचंद्रजी पवार यांच्या छत्रछायेखाली राजकारणाचे धडे गिरवून आले आहेत.

यामुळे अजित दादांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांनी एकप्रकारे बारामती मतदारसंघावरील दावा सोडल्याचे बोलले जात आहे. पण जर अजितदादा बारामती मधून निवडणूक लढवणार नाहीत, तेथून त्यांचे सुपुत्र जय दादा निवडणूक लढवतील, तर मग अजित पवार कोणत्या विधानसभेत उभे राहणार हा मोठा यक्षप्रश्न आहे. मात्र आता यावरही समाधान प्राप्त झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अजितदादा कर्जत जामखेड मधून आपले नशीब आजमावणार आहेत. एकंदरीत अजितदादांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा मास्टर प्लॅन रेडी केला आहे. विधानसभा निवडणुकीतून जय दादा यांची सक्रिय राजकारणात लॉन्चिंग केली जाणार आहे. खरे तर कर्जत-जामखेडचा मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाकडे आहे. या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांचा पराभव झाला होता.

येथून गेल्यावेळी शरचंद्रजी पवार यांचे नातू रोहित पवार विजयी झाले होते. आता मात्र रोहित पवार यांच्यासमोर अजित दादा नावाचे एक वादळ उभे ठाकणार आहे. यामुळे यावेळी रोहित पवारांना कडवी झुंज द्यावी लागणार असे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे कर्जत जामखेड मधून अजितदादा उभे राहतील या चर्चांना स्वतः रोहित पवार यांच्या एका विधानामुळे उधाण आले आहे.

काय म्हणालेत रोहित पवार?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहली आहे. ही पोस्ट अजित दादा यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करणे ही चूक होती, अशी कबुली दिल्यानंतर समोर आलीये. यामध्ये रोहित पवार यांनी, खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती.

ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.

यामुळे रोहित पवार यांच्या विरोधात अजित दादा उभे राहतील अशा चर्चांना वेग आला होता. अखेरकार आता अजितदादा यांनी स्वतः बारामती मधून विधानसभा लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. म्हणून आता कर्जत-जामखेड मध्ये यावेळीच्या निवडणुकीत काका-पुतण्यामध्ये टफ फाईट पाहायला मिळणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe