जय पवारांच्या कर्जत-जामखेड दौऱ्यानंतर भाजपात खदखद, राष्ट्रवादीत नाराजगी, शरद पवार गट चिंतेत ; अजित दादांच्या डोक्यात काय?

विधानसभेच्या अनुशंघाने अहमदनगरमधील राजकीय गणिते विविध रंग घेऊ लागली आहेत. जिल्ह्यात दोन्ही पवारांच्यातच राजकीय फाईट रंगेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
jay pawar

Ahmednagar Politics : विधानसभेच्या अनुशंघाने अहमदनगरमधील राजकीय गणिते विविध रंग घेऊ लागली आहेत. जिल्ह्यात दोन्ही पवारांच्यातच राजकीय फाईट रंगेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी काल (रविवारी) कर्जत-जामखेड मतदारसंघाचा दौरा करून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्यात. येथे रोहित पवारांच्या विरोधात जय पवार लढतील असे म्हटले जात आहे.

त्यांच्या या दौऱ्यानंतर आ. रोहित पवार अर्थात शरद पवार गट चिंतेत पडला आहे. कारण कर्जत-जामखेड मतदारसंघावरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पकड सर्वश्रुत आहे. असे असले तरी जय पवारांच्या दौऱ्यानंतर स्वपक्षीय व सहकारी पक्ष देखील नाराज झालेत.

अर्थात भाजपात खदखद, राष्ट्रवादीत नाराजगी शरद पवार गट चिंतेत असे काहीसे वातावरण तयार झालेय. त्यामुळे अजित दादांच्या डोक्यात काय? असा प्रश्न पडलाय.

भाजपात खदखद
जय पवार यांच्या दौऱ्यानंतर भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कर्जत-जामखेड मतदार संघ भाजपचा असताना राष्ट्रवादीने केलेली चाचपणी भाजप कार्यकत्यांच्या पचनी पडली नसल्याचे दिसून आले.

जय अजित पवार यांनी कर्जत तालुक्यातील महायुतीतील निवडक पदाधिकाऱ्यांच्या घरी जात गाठीभेटी घेतल्या. कर्जत-जामखेड मतदार संघामधून निवडणूक लढवण्यासाठी पवारांची ही चाचपणी असल्याची चर्चा सुरू झाली.

इतर पक्षातील काहींना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांच्यावर नाराज असणाऱ्यांच्या जय पवार यांनी आवर्जून भेटी घेतल्या.

रोहित पवार यांच्या विरोधात कर्जत जामखेडमधून निवडणूक लढविण्यासाठी जय पवार यांची रणनिती यातून समोर आली. २०१९ चा अपवाद वगळता सलग पंचवीस वर्षे या मतदारसंघात भाजप विजयी होत आले आहे.

आजही या मतदारसंघावर भाजपची पकड आहे. त्यामुळे पवारांची ही चाचपणी भाजपच्या पचनी पडली नसल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीत देखील नाराजगी
अजित पवार यांनी अंबालिका कारखाना घेतेवेळी ज्यांनी विरोध केला, त्यांच्याच घरी जावून जय पवार यांनी भेट घेतल्यामुळे पक्षांतर्गत देखील काही प्रमाणामध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

पक्षातील प्रामाणिक पदाधिकारी आणि कार्यकत्यांना मान मिळावा, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऐकू येवू लागला आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe