‘या’ फार्मूल्याचा वापर करा व होमलोन घ्या! आरामात खरेदी करा स्वप्नातील घर; नाही राहणार ईएमआयचे टेन्शन

तुम्हाला देखील होमलोन घेऊन घर विकत घ्यायचे असेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर 3/20/30/40 चा फॉर्मुला वापरणे गरजेचे आहे. तुम्ही जर हा फॉर्मुल्याचा वापर केला तर तुमच्या घराचे आर्थिक बजेट देखील चांगले राहते व प्रत्येक महिन्याला ईएमआय सहज भरला जातो.

home loan

तसे पाहायला गेले तर घर खरेदी करणे आजकाल हवे तेवढे सोपी गोष्ट नाही. कारण आजकालच्या महागाईच्या कालावधीमध्ये घर आणि जागांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला घर खरेदी करता येईल असे होत नाही. कारण याकरिता आवश्यक असलेला संपूर्ण पैसा प्रत्येकाकडे असतो असे देखील नसते व त्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होतात.

परंतु आता अनेक बँकांच्या माध्यमातून होमलोन अगदी सहजरीत्या उपलब्ध होत असल्यामुळे होम लोनच्या मदतीने तुमच्याकडे पैसे नसतील तरी घर सहजपणे खरेदी करता येणे शक्य होते. त्यानंतर मात्र घेतलेल्या होम लोनचे ईएमआय वेळेवर भरणे देखील तितकेच गरजेचे असते.

परंतु होम लोनची परतफेड ही दीर्घ कालावधीसाठी असल्यामुळे अनेक वर्षांपर्यंत आपल्याला योग्य आर्थिक नियोजन ठेवावे लागते व दर महिन्याला व्याजासह  या घेतलेल्या होम लोनचा हप्ता भरावा लागतो. परंतु यामुळे बऱ्याचदा आर्थिक नियोजन विस्कळते व घराचा बजेट देखील विस्कळतो व ईएमआय हा एखाद्या ओझ्यासारखा वाटायला लागतो.

त्यामुळे या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर कर्ज घेताना तुम्ही काही गोष्टींचे काळजी घेणे खूप गरजेचे असते व त्यानंतरच होम लोन चा निर्णय घ्यावा. या लेखामध्ये आपण याबाबत महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत त्यानुसार तुम्ही होमलोन घेतले तर तुम्हाला अशा अडचणींना तोड द्यावे लागणार नाही.

3/20/30/40 चा फॉर्मुला येईल कामाला

तुम्हाला देखील होमलोन घेऊन घर विकत घ्यायचे असेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर 3/20/30/40 चा फॉर्मुला वापरणे गरजेचे आहे. तुम्ही जर हा फॉर्मुल्याचा वापर केला तर तुमच्या घराचे आर्थिक बजेट देखील चांगले राहते व प्रत्येक महिन्याला ईएमआय सहज भरला जातो. त्यामुळे या फार्मूल्यातील प्रत्येक अंकाचा अर्थ आपण बघू.

1- तीन या अंकाचा अर्थ या सूत्रातील तीन या अंकाचा अर्थ जर बघितला तर तो असा होतो की तुम्ही जे घर खरेदी करणार आहात त्याची किंमत तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न जितके असेल त्याच्या तिप्पट नसावी. म्हणजे जर तुमचे वार्षिक पॅकेज दहा लाख रुपये असेल तर तुम्ही कमाल 30 लाख रुपये पर्यंत घर किंवा फ्लॅट खरेदी करू शकतात. यापेक्षा जास्त महाग घर खरेदी करू नये.

2- वीस या अंकाचा अर्थ या सूत्रामधील 20 म्हणजेच तुम्ही किती कालावधीसाठी कर्ज घेतले आहे म्हणजेच कर्जाची मुदत होय. आपल्याला माहित आहे की आपण जितके जास्त कालावधीसाठी कर्ज घेतो तितका ईएमआय कमी राहतो. बँकेला व्याज मात्र जास्त द्यावे लागते व आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठे नुकसान होते.

त्यामुळे कर्जाचा कालावधी अशा प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला बँकेला जास्त व्याज द्यावे लागणार नाही आणि खूप ईएमआय देखील सहन करावा लागणार नाही. अशा परिस्थितीमध्ये कर्जाचा कमाल कालावधी वीस वर्षापेक्षा जास्त नसावा. कारण वीस वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही ईएमआय सहजपणे भरू शकता.

3- तिस अंकाचा अर्थ या सूत्रातील तिस अंकाचा अर्थ पाहिला तर तो होतो तुमचा होम लोनचा ईएमआय. तुमचा ईएमआय हा तुमच्या महिन्याच्या कमाईच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. समजा तुम्हाला प्रत्येक महिन्याला 75 हजार रुपये पगार मिळत असेल तर तुमचा ईएमआय 22500 रुपयांपेक्षा जास्त नसावा.

4- चाळीस या अंकाचा अर्थ या सूत्रातील चाळीस हा अंक तुमचे डाऊन पेमेंट रक्कम दर्शवतो. जेव्हा तुम्ही घर खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्याचे डाऊन पेमेंट करणे गरजेचे असते. बऱ्याचदा आपण घरासाठी दहा किंवा वीस टक्के डाऊन पेमेंट देऊ शकता आणि उरलेली रक्कम होमलोनच्या माध्यमातून अरेंज करू शकता.

परंतु असं केल्याने गृह कर्जाची रक्कम वाढेल आणि ईएमआयचा बोजा देखील वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही 40% डाऊन पेमेंट करण्याचा प्रयत्न करावा. जर आपण हे उदाहरणाने समजून घेतले तर हा मुद्दा व्यवस्थित समजेल.

समजा तुमचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये आहे आणि तुम्ही तीस लाख रुपयांचा फ्लॅट विकत घेतला तर तुम्ही बारा लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करावे. म्हणजे तुम्हाला 18 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल व अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ईएमआय देखील कमी भरावा लागेल व तुम्ही तो महिन्याला सहजासहजी भरू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe