युवा नेतृत्व गौरव नरवडे यांची तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली. शनिवारी हा सोहळा जखणगाव येथे पार पडला.
खा. नीलेश लंके, जिल्हाध्यक्ष रामभाऊ निमसे, उपाध्यक्ष प्रा.काकडे सर आदींच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, सरपंच डॉ.गंधे, मुजिब शेख, अनिल नरवडे, मुबारक शेख आदी उपस्थित होते.
युवकांचे प्रश्न सोडवण्यावर भर : नरवडे
युवकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत. शैक्षणिक असो किंवा रोजगार संदर्भात असो युवकांना अनेक समस्या असतात. या समस्या सोडवण्यावर माझा विशेष भर असेल.
खा. निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे संघटन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढीस लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राजकारण हे समाजसेवेसाठी असते.
परंतु याचा विसर जणू काही आजच्या नेते मंडळींना पडला आहे. आधी समाजकारण मग राजकारण असे धोरण ठेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गौरव नरवडे यांनी सांगितले.
विद्यार्थी दशेपासून राजकारणात
युवा नेतृत्व गौरव नरवडे यांना विद्यार्थी दशेपासून राजकारणाची आवड होती. २०१७ मध्ये खा. नीलेश लंकेंच्या व्यक्तिमत्वाला प्रभावित होत राजकारण सक्रिय सहभाग घेतला.
२०१९ ला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये जिल्हा सरचिटणीस पदावर देखील नरवडे यांनी काम केले आहे. २०२१ ला राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष म्हणूनही पदभार त्यांनी पाहिला. वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर,
वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम असोत किंवा विद्यार्थीच्या प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेणे असो यात ते नेहमीच सक्रिय असतात. त्यांच्या या करण्याची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या नगर तालुकाध्यक्ष पदी संधी देण्यात आली.