हप्ते गोळा करत मतदारसंघ गहाण ठेवला, आ. राजळेंबाबत गंभीर गौप्यस्फोट

दोन्ही तालुक्यात प्यायला पाणी नाही, नीट रस्ते नाहीत, कोट्यवधींचा पीक विमा आणला म्हणतात मात्र शेतकऱ्यांच्या हातात एक रुपया नाही, शेअर मार्केटमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले मात्र दहा वर्षानंतर यांनी विधानसभेत आवाज उठवला.

Ahmednagarlive24 office
Published:
Monika Rajale

Ahmednagar Politics : दोन्ही तालुक्यात प्यायला पाणी नाही, नीट रस्ते नाहीत, कोट्यवधींचा पीक विमा आणला म्हणतात मात्र शेतकऱ्यांच्या हातात एक रुपया नाही, शेअर मार्केटमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले मात्र दहा वर्षानंतर यांनी विधानसभेत आवाज उठवला.

केवळ हप्ते गोळा करत यांनी मतदारसंघ गहाण ठेवला असून या वेळी परिवर्तन करा व चंद्रशेखर घुले यांना विधासनसभेत पाठवा, असे आवाहन माजी आमदार नरेंद्र घुले यांनी केले. हरिहरेश्वर येथे शेतकरी मेळाव्यात घुले बोलत होते.

यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले, मधुकर पाटील, काकासाहेब नरवडे आदी उपस्थित होते. न घुले म्हणाले, तुम्ही एकदा विजयी तर एकदा पराभव केला. तो आम्ही स्वीकारला. एकदा तुमच्या सांगण्यावरून – ढाकणे यांना पाठिंबा देत शेवगावमधून मताधिक्य दिले, मात्र उपयोग झाला नाही.

दहा वर्ष केवळ फसवण्याचा उद्योग झाल्याने गतवैभव मिळवून देण्यासाठी आता लढाईचा निर्णय घेतला आहे. शेवगावला नगरपालिका झाली, मात्र जुने ग्रामपंचायत कार्यालय आम्ही उभारलेल्या क्रीडा संकुलात नेले. दोन इंच शेवगाव शहरात पाऊस झाला तर अनेकांच्या घरात पाणी गेले.

एसटी स्टॅन्ड अजून सुधारले नाही. गोरगरिबांचे पैसे शेअर मार्केटमध्ये बुडत असताना हे काही बोलले नाहीत. ट्रेडिंगवाले पसार झाल्यानंतर यांना जाग आली. आम्ही ज्याला स्पर्श करतो त्याचे सोने होत असल्याने तुम्ही आता घाबरू नका.

तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. घुले म्हणाले, जायकवाडी धरणावर पहिला हक्क शेवगाव तालुक्याचा असून मतदारसंघातील प्रत्येक गावात जायकवाडीचे पाणी आणू.

मतदारसंघात डोंगरी विकासचा निधी येणार होता तो संगमनेरला गेला. डीपी आणण्यासाठी केडगावला जावे लागते. या वेळी तिरंगी लढत होणार आहे. शेवगाव तालुक्यातून एक लाख तर या तालुक्यातून पन्नास हजार मते घेऊन निवडून यायचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe