शेतीसाठी वरदान आहे ‘हा’ इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! कराल एकदाच चार्ज तर 8 एकर शेताची कराल आरामात नांगरणी, वाचा माहिती

आता भारतामध्ये शेती क्षेत्रात महत्त्वाच्या असलेला भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर AutoNxt X45 लॉन्च केला आहे व हे 45 एचपीची इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.

Ajay Patil
Published:
autonext x45 electric tractor

ज्याप्रमाणे आता भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाटत असून यामध्ये बाईक, स्कूटर व विविध कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च करण्यात येत आहेत. अगदी याच पद्धतीने आता भारतामध्ये शेती क्षेत्रात महत्त्वाच्या असलेला भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर AutoNxt X45 लॉन्च केला आहे व हे 45 एचपीची इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.

हे एक पावरफुल असे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असून त्याचा लूक आणि डिझाईन ही पारंपारिक डिझेल ट्रॅक्टर सारखीच आहे. फक्त शेतीची कामे कमी खर्चात करता यावीत या दृष्टिकोनातून या ट्रॅक्टरची रचना करण्यात आलेली आहे.

या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने 32 kW ची इलेक्ट्रिक मोटर दिली असून ती 45 एचपीची कमाल पावर जनरेट करते. त्यामुळे हा ट्रॅक्टर जड काम सहजपणे करू शकतो. यामध्ये 35 KWHr क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे आठ एकर क्षेत्रात आठ तास काम करू शकते.

 चार्ज होण्यासाठी किती वेळ लागतो?

AutoNext X45 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चार्ज करण्याकरिता दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला पर्याय पाहिला तर तो होम सॉकेट(15A) असून या सॉकेटशी कनेक्ट करून ट्रॅक्टर सहजपणे चार्ज केला जाऊ शकते.

तसेच दुसरा प्रकार म्हणजे या ट्रॅक्टरची बॅटरी नियमित म्हणजे सिंगल फेजने देखील पूर्णपणे चार्ज करता येऊ शकते या पर्यायाने चार्ज होण्यासाठी सहा तासाचा कालावधी लागतो.

परंतु थ्री फेज चार्जर चा वापर केला तर 24 तासांमध्ये बॅटरी पूर्ण चार्ज होते. तसेच दहा ते पंधरा टनाच्या उत्कृष्ट लोडिंग क्षमतेसह हे ट्रॅक्टर येते. ज्याप्रमाणे आपण डिझेल ट्रॅक्टरच्या माध्यमाने इतर अवजारांचा शेतात वापरू शकतो.अगदी त्याच पद्धतीने या ट्रॅक्टर द्वारे देखील सर्व उपकरणे चालवता येतात.

 वाचेल डिझेलचा खर्च आणि पैशांमध्ये होईल बचत

समजा एखाद्या शेतकऱ्याने जर तीन हंगामात आठ एकर शेतीचे काम केले आणि इतर व्यावसायिक कामे केली तर त्या काळात तो डिझेलवर लाखो रुपयांचा खर्च करत असतो. परंतु आता या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा जर वापर केला तर दरवर्षी लाखो रुपयांची बचत शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने डिझेलचा खर्च वाचवता येतो व हा ट्रॅक्टर तुम्ही पाचशे तास वापरल्यास डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत तब्बल दोन लाख रुपये तुम्ही वाचवू शकतात. तसेच कंपनीचे म्हणणे पाहिले तर त्यानुसार या ट्रॅक्टरचा देखभाल खर्च देखील खूप कमी आहे व हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर डिझेल  ट्रॅक्टरच्या तुलनेत चालवण्याचा खर्च देखील कमी येतो.

 किती आहे या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी लाईफ?

या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी लाइफ लोड तसेच वापर आणि तापमान श्रेणी वर अवलंबून असते. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये स्मार्ट स्वॅप करण्यासारखे मॉड्युल आधारित बॅटरी आहे.

कंपनीच्या वेबसाईट नुसार बघितले तर या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी सामान्य कामकाज परिस्थितीमध्ये 8 ते 10 वर्षे सहजपणे टिकू शकते. हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सध्या भारतात सगळीकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे व ट्रॅक्टरच्या बुकिंगशी संबंधित तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ती घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe